आत्म्याच्या शोधात मला आज एक नवीन बोध झाला ... त्यावरून
हा लेख तयार करीत आहे. आजचा बोध माझा दुसरा
किंव्हा तिसरा बोध असणार ... पण आज जे घडलं
त्याची तीव्रता खूप वेगळी होती ; आणी त्याचे
निष्कर्ष निर्निर्याला दिशेत निघाले; त्या निष्कर्षांचे तरंग अजूनही माझ्या मनात वावरत
आहेत . इतक्या तासांनी सुद्धा तोच विचार मनात असल्यामुळे आपलं अनुभव एका लेखात मांडण्याची
इच्छा जागृत झाली... ह्या अनुभव मागची एक पटकथा पण आहे - ती पूर्णपणे तर मांडता येणार
नाही, कारण त्याचा वेळ अजून आलेला नाही; पण ती पटकथा पण थोड्याफार शब्दात मांडतो आहे. कोणची वस्तू, कोचीपण
गोष्टं किंव्हा तथ्य विना पटकथा च्या समजणे वा उमजणे कठीणच असतं.
पटकथा
थोडक्यात सांगितलं तर एवढंच कि दरेक प्रसंगाची एक वेळ असते. असं समजा कि आजची वेळ तशीच. आजचा प्रसंग अनुभव,
आत्मबोध - जे वाट्टेल ते म्हणा - माघील कितीक दिवसांचा निष्कर्ष असावा. आधीच्या लेखन
मध्ये देखील मी सविस्तर आपल्या वाटेबद्दल नीटपणे मांडलं आहेतच; तरीपण सांगतो. माझी
शोध सुरु झाली १० वर्ष आधी - माझ्या वडिलांच्या
चितेवरती, जेम्व्हा माझ्या मनात प्रश्न पडला
- हे सगळं प्रपन्च, सगळं संसाराचं प्रसन्ग कश्यामुळे? कोणासाठी? बाबाचं जे काही होतं
इथेच राहिलं. बरोबर तर काही नाही गेलं. मग काय अर्थ सगळ्या भौतिक सामग्री एकत्र करण्याचा?
जगायला लागतात भौतिक वस्तू - तेवढंच नं? आपण काय घेऊन जातो बरोबर? आपले कर्म, फक्त
कर्म. हि तेम्हा ची मनःस्थिती.
हा प्रश्न सोडवायला माझी धावपळ सुरु झाली साधारण ४-५ वर्षां पूर्वी. आधीपण मला
चूक कर्म करायला खूप खूप त्रास व्हायचाच; अशक्यच
पडायचं. मनात नेहेमी प्रश्न राहायची, विचार यायचे कि हे चूक आहे तरीपण मी कां करतो.
लोकं मला मूर्ख म्हणायची - तोंडांवरही. त्याचा त्रास कधीच नाही झाला - कमीत कमी चूक किंव्हा पाप करण्याच्या त्रासासमोर खूप कमी. पण बाबा गल्यानन्तर चुकांचा
त्रास शंभर टक्के वाढला ... बाबांचा जाण्याचा
मला फार धक्का लागला होता. अजूनही, ११ वर्ष झाले - मी विसरलो नाही. पण आता कळलं - तो धक्का
आणि ते विचार माझ्या करता बाबांचं अंतिम शिक्षण
होतं ... त्या दैवपुरुषा चा मला आशीर्वाद होता. ते जातानाही - चितेपर्यंत मला शिकवत
राहिले ... अशे वडील खूप जन्मांच्या पुण्याई मुळे भाग पडतात!
असो. अपण मुद्द्यावरती पोचू, इतर गोष्टी खूप झाल्या. अपण विशाल काळे ह्यांची जीवनी वाचायला
नाही उघडला हा लेख! गेल्या ४एक वर्षाहून मी भगवद गीता चे नियमित पारायण करीत आहे, आणि
वेगवेगळे उपनिषद - ईश - केन - कठ - प्रश्न - मुंडक - मांडुक्य - ऐतरेय - तैत्तरीय - श्वेताशर - महानारायण - आणि आता बृहदारण्यक. {ह्या अखेरच्या उपनिषदातलं सध्या याज्ञवल्क्य मैत्रेयी
संवाद वाचतो आहे. हे सांगायचं कारण असं कि
तुम्हाला माझी वाट आवडली असेल तर माझं वाचन गरजेचं - तेथूनच मला वाट मिळाली}. ४
वर्षाहून प्रत्यत्न चालू; सुरवात झाली आवड मुळे; सवय झाली आवड वा भीती मुळे - आणि मग
हळू हळू श्रद्धा उत्पन्न हवायला तयार झाली. कळायला लागलं कि ह्यवाचनाचा माझ्या मनावर
चांगला परिणाम होत आहे - मन शांत राहायला सुरुवात झाली... आवडी निवडी बदलू लागल्या...
आणि वाट जी मी शोधत असो ती थोडीफार कां नसो
- दिसायला लागली. हि झाली आज पर्यंत ची पटकथा...
आजचा माझा
बोध
असा काही मोठं नाही घडलं - पण जितकं घडलं माझ्या करता
खूप प्रासंगिक आणि मोठं आहे. माघील भागात मी आत्माचि वाट बद्दल माझे विचार मांडले आहेतच
: मनःशांती ची शोध : श्रीमद भगवद गीता ३
ह्या लेखात. त्यांनंतर मी कर्म आणि त्यांचं निर्वाह कसं करायचं ह्या मृगतृष्णा सारख्या
संसारात - ह्यावर ३ लेख उल्लेखित केले - सगळे आपल्या स्वतःच्या जीवनहून शिकून. हि माझी
वाट आहे - आणि हि सगळे लेख माझ्या जीवनात, माझ्या अंतःकरणात आलेल्या विचारांचं खरं
खुरं कथन समजावं. हे विचार मी आत्मसाध केल्या नन्तर मांडतो - कारण मी माणूसच. महापुरुष
अज्जीबात नाही. चुकेन. तेम्हा हे लेख वाचून पुन्हा एकदा मार्ग धरू शकीन, अशी माझी विचारधारा.
आज राखी चा दिवस - भाऊ बहिणींचा पर्व. सकाळी गीताचे
वाचन केले - त्या नंतर याज्ञवल्क्य मैत्रेयी
संवाद चं पान वाचलं. आजचा {आणि माघील या ४एक
दिवसांचा} विषय होता याज्ञवल्क्ययांचा आत्म्याबद्दल सुंदर विवेचन. निष्कर्ष असा कि
आतमा ची नुसती जाणीव असता कामा नाही - पुरेसं नाही. श्रवण, मनन आणि निदिध्यासन तिन्ही
केल्याशिवाय कळत नाही. जर आत्माचि खरी ओळख हवी असेल, तर आपल्या स्वतःच्या आत्मस्वरुपाबद्दल
{अर्थात आत्मा बाबत} हे गुरुहून ऐकून त्यावर मनन व निदिध्यासन केल्याशिवाय कळत नाही . {हा विचार पुढे नन्तर बघू,
कोणच्या पुढील भागात}. अधी मला आत्माचं भास थोडासा झाला तर होता - पण आज {आणि माघील
४ दिवसांच्या} वाचनाने पुष्कळ शांतता भेटली
आज झालं असं कि सगळे प्रसन्ग एका माघून एक जुळून आले; सणवार - मी एकटा - माझं मनन
व वाचन - आणि माझं जगात वावरणं व जगाच्या प्रपंचावरती माझं कर्म/विचार - सगळंच जुळून
आलं. मागच्या भागात {एकटेपणा} मध्ये मी लिहलं : अपण एकटे आलो ह्या जगात, आणि एकटेच
प्रयाण करणार इथनं. पण ते कथन जरी मला कळत असेल, तरी सुद्धा दर काही दिवसात एखाद्दा
कां नसो, लक्ष्यात येतच कि मी एकटा आहे. जाणीव होतेच. अर्थ असा, कि मनातली इच्छा कुठे
तरी दबलेली आहे. म्हणजे - जरी मला कळलं असेल कि मनाला धीराने धरावं, तरी सुद्धा इच्छा आहेच. ह्या इच्छे
मुळे कधी न कधी तर माझा कर्म तिकडे जाईल - मग काय फायदा एवढ्या वर्षांच्या तपस्येचा,
जे मि केली आहे? दुसऱ्या अर्थाने हि तपस्या नव्हतीच - हि होती गरज . तपस्येची इच्छा
कुठेतरी होती - पण खऱ्या अर्थाने माझ्या वावरण्यात, माझा कर्मात उतरली नव्हती.
मनाला जर सावरायची गरज होत असेल तर काहीच अर्थ नाही.
मन नुसतं आत्म्याकडे स्थिर राहिलं पाहिजे दिवस रात्र - पण हे करताना संसारात कोणाला
आपल्या मुळे त्रास होता कामा नाही. अर्थ असा कि ह्या शरीराचे जितके कर्तव्य आहे ते
पूर्णपणे करा - पण मना ला लावू नका त्यांच्यात. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा; नाती
पाळा; प्रेमाचे सम्बन्ध ठेवा; पण काहीसुद्धा मनाला लावू नका. चांगलं झालं - व वाईट;मनातल्या
तरंगांवरती असर नाही झाला पायजे. हे तेम्व्हाच
शक्य होईल जेंव्हा आपण मनाला सावरणं सोडून आत्म्यावरती, देवावरती पूर्णपणे स्थिर होऊ. तो होईल पहिला पडाव. अजून पर्यंत
अशी स्थिती आलीच नव्हती कि असे काही माझ्या लक्ष्यात आलं असेल.
निष्कर्ष
पण आज हि तीव्रपणे लक्ष्यात आलं कि मनात एक क्षणभर सुद्धा
काही नव्हतं - स्वच्छ, साफ आणि शीतल. मनात एकच आलं - बरं झालं - एकटा आहे म्हणूनच हि
जाणीव आली. म्हणूनच हा प्रसन्ग आला कि मी ह्या मार्गा वर निघालो. म्हणूनच मला अशे अनुभव
भासले आणि अशे बोध नशिबी आलं. एरवी मी कोणाचाही
लेख तास दोन तासात लिहून मोकळा होतो; आज पहिल्यांदा ७ तासापासून विचार करून लिहिणं
चालू आहे. एव्हढं मनावरती नियंत्रण ठेवणं नवीनच
अनुभव माझासाठी. आज कोणाशीही वाईटपणा उरलेला नाही; मित्र असो वा नाती कोणाशीही वैर किव्हा ओढ उरलेली नाही. मनात
काही इच्छा नाही; काही अपेक्षा नाही; काही वैर नाही वा काहीसुद्धा अपूर्ण राहिलेलं
आहे अशीपण भावना नाही
हा बोध, मनःस्थिती
आजची आहे बरंका; हे उद्यापण टिकेल ह्याची खात्री नाही. पण आज मला आनंद काय असतो, खरा
आनंद - हे कळायला लागलं आहे. कमीत कमी खऱ्या आनंदाची, खऱ्या समाधानाची थोडी शी झलक
भेटली. ह्या राखीला विसरणं मला शक्य नाही - मनात वावरणारे सगळे विचार, सगळ्या इच्छा
, सगळ्या पस्तावा आणि सगळ्या महत्वाकांक्षा नाहीश्या झाल्या आहेत. आता पुढचा पडावं
- ह्याला टिकवण्याची तपस्या, ह्याला मनन करून, निदिध्यासन करून नीट मनात बसवून ह्याच्यावर
सम्पूर्ण विश्वास ठेवून पुढची वाट शोधणे. देवाच्यापुढे माझा श्रद्धाभक्तीपूर्ण नमस्कार
- त्यांनी अशी संधी दिली मला कि असा प्रसंग मला कळला ...
4) एकटेपणा
Comments
Post a Comment