जगायच्या उठापटक मध्ये आपण सर्वस्व विसरतो ... हे मी आधी सुद्धा अपल्या लेखन मध्ये जाहीर केलेलं आहे. अपल्या मेल्या नंतर सगळं इथेच राहतं हे तर नक्कीच, ह्यात काहीच वाद नाही. तरी पण अपण आपलं सर्व जीवन अश्या मृगतृष्णा माघे पळत राहतो, हे पण अपण माझ्या लेखनात वाचलं. शक्य आहे कि इतर कुणाच्या लेखात सुद्धा तुम्ही वाचलं असेल. मी काही जगा वेगळा नाही. दुःखाची गोष्ट अशी कि हे माहित असल्या नंतरही अपण त्याच मृगतृष्णा माघे पळत पळत जीवन व्यर्थ करतो - विना काहींविचार करता. आपापले कर्म काय आहे, चांगले के वाईट ह्याचा विचारही नाही येत आपल्या मनात किंव्हा डोक्यात. विचार जरी आला तरीपण त्या विचारांकडे दुर्लक्ष करणं तर आपलं उत्कृष्ट स्किल आहेच.
पैश्या पायी अपण काय काय कर्म करतो - ह्याची जाणीव सगळ्यांना आहेच. तुमच्याहून चूक नसेल झाली, पण इतर लोकं काय प्रपंच करतात पैश्या च्या होड मध्ये ह्याबद्दल मला सविस्तर सान्गायची गरज खरतर नाही. हे सर्वविधीत आहे, उघड उघड दिसून येतं सगळ्यांना. हे कबूल आहे कि पैश्या शिवाय काहीच पर्याय नाही; जगायला पैसे लागणारच, आणि ह्या सत्यापासून सुटका नाही. जेम्हवापर्यंत हे शरीर आहे, ह्याच्या साठी पैसे लागणारच. हे शाश्वत सत्य आहेस. शंभर टक्के. पण ह्या होड मध्ये आपण - मी सुद्धा - कधी हा विचार केला कि कुणाचा किती नुकसान करत असतो आपण? मी कुकर्मांबद्दल टीका टिप्पणी करतो आहे असं नाही; माझा स्पष्ट इशारा आहे आपले तर्कसंगत लीगल कर्मांकडे. कुकर्म तर वेगळीच गोष्ट ठरते : त्याचा विवेचन नंतर करूया!
एकदा - फक्त एकदा - जरा थांबा. विचार करा. आपण सगळं इथेच सोडून जाणार आहे. काहीच आपल्याबरोबर येणार नाही, आणि हे आपण सगळ्यांना नीट माहित असेलच. मग तरीसुद्धा अपण वर्षानुवर्षं त्या मृगतृष्णामाघे पळत बसतो. यश, पैशे आणि तसेच बाकी सगळं वस्तुंपायी अपण अपल्यांना, स्वतःला व जगाला विसरून आपापला वेळ वाया घालवतो. खऱ्याअर्थाने हा विचार करावयास हवा कि असं काय करावं कि जगण्याचा बंदोबस्त होऊ शकेल, आणि जगण्याचा खराखुरा अर्थ समजून अपण असे जगूया कि वेळ वाया न घालवता, मृगतृष्णाच्या माघे न पळता आणि जीवांच्या ह्या संघर्षातून असे निघायचं कि आपलं जीवन सार्थक होऊ शकेल.
हा विचार जर सार्थक झाला आणि वाट जर मिळाली - तर आपण धन्य झालो, असं समजावं. ह्या जीवनाचा खरा आनंद घेऊन परत देवाकडे जाताना आपण हसत हसत अंतिम वाट घेऊ शकू. तेम्हवा मनात काही इच्छा उरणार नाही; काहीच विचार उरणार नाही. मात्र एक समाधान राहील कि संपूर्ण जीवन आनंदात राहिलो, कुणाचा नुकसान नाही केला, जितकं जगलो सार्थक जगलो, आनंदाला भरून पावलो, चांगली लोकं भेटली, जितकी बरोबर राहिली तेवढ्यातच भरून पावलो; इथेच कमवलं आणि इथेच ते मनापासून सोडून चाललो - सुटका घेऊन. ह्याला म्हणावं खरं जगणं. लोकांचा नुकसान करून, किंव्हा आपल्यालोकांकडे दुर्लक्ष करून, किंव्हा नाती तोडून, किंवा कुकर्म करून - काही केलं नाही ह्यांच्यासारख्या समाधानाची बरोबरी करणं अशक्य ठरेल.
पण इथवर पोचायला वाट मिळायला हवी. ह्या प्रपंचातून जर निघायचं असेल, तर सर्वताधी वाट भेटली पायजे. वाट भेटायला वाटेची ओळख आळसी पायजे : हि वाट चूक वाट नाही ह्याची जाणीव हवायला हवी. आणि ते तेम्व्हाच शक्य होईल जेम्व्हा अपण पैश्याला यशाला कीर्तीला अपयशाला अपकिर्तीला आणि स्वतवला {अर्थात आपला अभिमानाला, आपल्या घमंड किंव्हा गुर्मी ला} विसरू. लक्ष असावं तर फक्त आणि फक्त आपल्या कर्तव्या कडे, {स्तवताचा फायद्या कडे लक्ष न देता} देवाकडे आणि स्वतःला अंतर्मनातून समजण्याकडे. जेकाही कर्म होतील आपल्याहाती - अश्यावस्थेत कधीपण देवाविरुद्ध जाणार नाही, हे शम्भर टक्के. हो - इथवर पोचणं ह्या त्रिगुणी संसारात सोपं नाही - हे पण तेवढंच खरं. पण प्रयत्न हाच असायला हवा कि एकूणएक क्षण अपण जगायचं फक्त कर्तव्य, प्रेम, आस्था ठेवून. वाट आपोआप सापडेल, हि आपण खात्री मनात ठेवूया. मीपण खरंतर वाटच शोधतो आहे - आणि प्रयत्न आहे आस्था विश्वास आणि सत्यात रहायचा, कर्तवय न विसरायचा.... आणि हेच गीता व उपनिषद पण शिकवतात आपल्याला...
Comments
Post a Comment