माझं श्रीमद गीता आणि उपनिषद पासून जे शिकलो
आहे, त्या शृंखलातला पुढचा लेख :
आज सव्वीस मे ... म्हणजे माझा वाढदिवस. आता
प्रश्न हा येतो की हा दिवस कसा साजरा करायचा? आणि कुठे? मी पुण्यात होतो, एकटा. दिवसभर
एकटेपणा जाणवलाच नाही - माहित नाहीं कां. दिवस कसा निघाला कळलं सुद्धा नाही. सकाळ ची
संध्याकाळ कशी झाली आणि वेळ कुठे निघून गेला काहीच कळलं नाही. माझ्या मनात खरंतर ह्याबाबत काही आलेच नाही. कां म्हणून असे आहे हे अजूनतरी
नीट नेटकं कळलं नाही. वाढदिवस कसा साजरा करायचा ह्याची मी काही प्लॅनिंग तर केली होती
- अर्धीच पूर्ण झाली. पण जितकी झाली, संतोषप्रद ठरली. अजून काय हवंय माणसाला? मन भरून
पावलं कि समजायचं सगळं जग मिळालं!
पुढे वाढण्या आधी मी सकाळचं एक मजेशीर प्रकरण
सांगतो - माझ्यासाठी फारच महत्वाचं ठरलं. मी रोजच्या प्रमाणे सकाळी उपनिषद पाठ करत
असो; सध्या महानारायण उपनिषद सुरु आहे. पहिलच पारायण. एक श्लोक मनात बसून गेला - मचकूर
असा कि मी खूप मजा केली; भरून पावलो. आता देवा
मला आपल्या पायात थोडी जागा दे. {महारानारायण उपनिषद, नवमोध्यायः, श्लोक १}.
माझ्या मनात, अंतर्मनात एक विचार आला - किती बरोबर लिहिलं आहे, खरच आपण खूप मजा केली
आहे, आणि ह्यात काहीच वाद नाही. आता वेळ हि आहे कि माझी जितकी राजसी व तामसी सवयी आहे,
त्यांना शोधून बाहेर काढायचं. देवाघरी जाऊन
मन खालती होता कामा नाही. आणि हे मी एकटेपणा किंव्हा त्रासून बोलत आहे असे हि नाही
- आज मी पोखरण बघितली, गोड घेतलं; आणि एकटेपणा आवडला आज - अंतर्मनात शिरून स्वतःला
समजू शकलो. एरवी अश्या दिवशी लोकं लागतात - मला खरच छान वाटलं एकटेपणात, कारण एक खूप
मोट्ठी भेट मिळाली!
खरंतर माझा विचार होता कि देवाचा आशीर्वाद घेऊन बाहेर मज्जा करूया - एकटेपणा चा पूर्ण पूर्ण फायदा उचलुया. म्हणून पोखरण, आणि
मग जेवायला बाहेर - तेपण बेल्जियन वाफल्स. पण सकाळच्या प्रकरणानी माझा मनापर्यंत असर
केला - पोखरण बघितल्या नंतर जेवायला मला स्वतःच्या
हाताची भाजी चीच आठवण आली. आणि हे आजपासून नाही - मला गेल्या दोन-चार महिन्या पासून
स्वतःच्या हाताचं जेवणच आवडतं. माहित नाही कां; बाहेर च्या तडक भडक पेक्ष्या स्वतः
काही करून खाण्यात जो आनंद आहे, तसा दुसरा आनंद क्वचितच भेटतो. मग मनात विचार आला कि
मज्जा म्हणजे काय? आधी बायको पोराची आठवण आली - तितक्याच लवकर विसरलो हि. तो खरा आनंद
नव्हे; जर आनंद चा विचार आला - तो मग एकच : दिवस भर मस्त आपापले सजीव शरीराचे संपूर्ण
काम करायचे - आणि मग देवाची आठवण करत झोपायचं.
आता जर दिवस भर शरीर निर्वाहाचे काम करत असो
- तर बायको पोरगा आपोआपच आलाच नं त्या यादीत? आणि हेच गीतोपदेश पण आहे. हेच आपले उपनिषद पण म्हणतात : सुटका मिळायला आपली सगळी कामं, जीम्मेदाऱ्या नीटपणे निभवायला हवी. नीटपणे
म्हणजे excess नाही - त्याला हावरटपणा म्हणतात.
मग जितकी चुकी असतील - खोटं बोलणं, अभिमानाने वागणं, मद-मोह, हावरटपणा, क्रोध, लोभ,
काम वासना, वगरे - सगळ्यांवरती विजय घ्यावी. हे सगळं जरका आपण नीटपणे पार पाडलं - तर मग कुठे आपण मोक्ष मार्गावर आलो असे समजावे.
मोक्ष मिळेलच असे नाही म्हणत आहे मी; फक्त त्या मार्गावर आलो असं!
आई म्हणायची - आपमरे पीछे डूब जाये दुनिया.
मग आपण कां म्हणून ह्या कधी न संपणाऱ्या प्रपंचात पडतो आणि अडकून बसतो? शेवटी काय येतं
हातात? शून्य? मग अर्थ काय राहिला सगळं वायफळ वस्तूं माघे धावण्या चा? त्या पेक्षा
चांगली कामं करून पुण्य तरी कमवा! आणि पुण्याच्या मार्गावर आल्यानंतर पुढची मार्ग सोपी
वाटू लागते. मोक्षाची वाट - पुन्हा ते गाणं लक्ष्यात आलं, हि वाट दूर जाते - स्वप्नामधील
गावा. माझ्या मनातला का तेथे असेल रावा! प्रश्न हा आहे कि जीम्मेदाऱ्या पूर्ण झाल्या
पाहिजे, बस तेवढच हवं. देवा पुढे मन खालती होता कामा नाही. हे सगळं मनात खरतर आधी पासून
होतं - पण आजच्या दिवशी प्रत्यक्ष झालं डोळ्यांपुढे.
आणि म्हणून म्हणालो कि एकटा होतो, बरच ठरलं.
बायको पोरगा बरोबर असते तर मीपण अडकून बसलो असतो तत्रैगुण संसाराच्या प्रपंच्यामध्ये.
आणि पुढची वाट हरवली असती. हा प्रसन्ग माझ्या जीवनी कां आला ते नीट मानसमोरी आलं आणि
कळलं सुद्धा, देवाच्या कृपेने. आणि म्हणून मी नेहेमी प्रमाणे शनिवार असल्यामुळे संध्याकाळी मंदिरात गेलो, आणि वाढदिवस असल्यामुळे सकाळी गणेश
मंदिरात गेलो तर एकच गोष्टं आली माझ्या मनात : देवा इतकी शक्ती द्या मला कि मला आपले सगळे कामं पार पाडता येतील, सगळ्या जीम्मेदाऱ्या
निभावता येतील - आणि नन्तर देवा मला मोक्ष प्रदान करा. आता पुन्हा जन्म नको. नको आता
हा प्रपन्च....
देवाला मी अजून एक मागतो :
ॐ
असतो मा सद्गमय ।
तमसो
मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा
अमृतं गमय ।
Comments
Post a Comment