मी हे कथानक अपल्या गीता प्रेम पासून सुरु केलं; पहिल्या
दोन भागात अपण गीता वाचन कसं आणि कां सुरु केलं ते पाहिलं; कर्माचा प्रपंच आणि त्याची
ओढ थोडी फार बघितली {ते नंतर सविस्तर बघू - ह्याच कथानकाच्या पुढच्या लेखन मधेच ; आणि
हे लक्ष्यात घेतलं के ह्याहून पुढे वाढायला, गीता चा सार नीट समजायला मन शांत ठेवण्याची
गरज असते. मग प्रश्न हा उठला कि जगाचा कोलाहल मध्ये, जगण्याचा प्रपंचामध्ये मनाची शान्तता
कशी आणावी? खरं तर ह्या प्रश्नाचा उत्तर दरेक माणसानी सवतःच द्यायचा असतो. ह्या मोठ्या
जगात निरनिराळे प्रकारांचे प्रश्न येतात, सगळ्यान
समोर नवीन परिस्थिती असते, सगळ्यांची मनं वेगळी असतात, विचार वेगळे असतात, आणि
नैसर्गिक गुणांचा खेळही वेगळा असतो - त्रैगुण्य - सत, रज, तम - ह्यांचा असर दरेक माणसावरती
वेगळा ठरतो. ह्या प्रश्नाचा काही सोपा उत्तर
भेटणार नाही - माझ्या शोधांनी तर मला हेच कळले आहे.
Source - Google Search |
माघील ४ वर्षापासुन सुरु केलेला ह्या प्रवासात एक मात्रं
लक्ष्यात यायला लागलं आहे आता : मलादेखील मन शांत करण्या साठी निरनिराळे प्रयोग करावे
लागतात. मन कोणच्या परिस्थित येऊन शांत होईल, हे सरळ रीती ने आधीपासून सांगता येत नाही.
ते माझ्या तेम्हा च्या मनःस्तिथी वरती अवलंबून असतं. आणि असेहीनाही कि ठराविक ठिकाणी
किंव्हा ठराविक वेळी मन शांत होतं. इतकंच नाही, मन शांत जर एका प्रयोगाने झाले - ह्याचा
हा अर्थ होत नाही कि पुढच्या वेळी पण तो प्रयोग कामास येईल. ते जसं मी म्हणालो आपापल्या
मनःस्तिथी वरती अवलंबून असतं. सुरुवाती ला असं खूप व्हायचं : मागच्या वेळी ह्यानी बरं
वाटलं - तर आता कां नाही? मग हळू हळू समज आली; आणि कळायला लागलं कि मला तीन चार स्थितीत
शांतता मिळते : रामकृष्ण आश्रम दांडेकर पूल पुणे; स्वामी समर्थ मंदिर, धायरी पुणे;
मराठी संगीत ऐकताना - यातर मग जेम्व्हा मी संपूर्ण पणे सतगुणाचा अवस्थेत असतो तेम्हा.
कोणाचीही स्थिती स्थिर अजूनपर्यंत तर राहिली नाही - ह्यांनीच समजावं कि हा प्रवास अजून
पूर्ण झालेला नाही!
इथे अपण
एक अर्धविराम घ्येऊ : सतगुण अवस्थेत राहायचा हा अर्थ अज्जीबात नाही कि तुम्ही संत झाला,
जगावेगळे झाला किंव्हा सन्यास घेतला! अपण ह्या
जगात, ह्या त्रैगुण्य युक्त संसारात सुद्धा सतगुणावस्थेत पोचू शकतो - सोपं नाही, पण
करू शकतो. पण हि फार पुढची पायरी आहेस अपल्याकरता - सध्या इतकच पुरे!
ह्या व्यतिरिक्त एकाच अवस्थेत थोडीफार शांतता मिळते
: जेमहासुध्दा मी अपली जवाबदारी पूर्णपणे पार पाडली , अपली जीवनी साठी केलेली प्रयास आणि माझ्या माणसांसाठी
जगायला पैश्यांचा बंदोबस्त केली तेम्हा. पण ह्यामार्गावर संपूर्ण शांतता नसते - कारण
असं कि जसच तुम्ही अपली जीवनी साठी सफल कार्य करता - त्या कार्यातून दुसृया इच्छा
जन्म घेतात. अश्या मध्ये मनाला बरं वाटतं ते खरं - पण ती खऱ्या अर्थात शांतता नव्हे.
हे अपण पुढच्या भागात सविस्तर पाहू. दुसरी गोष्टं अशी कि जीवनी च्या मार्गावर जर खोटं
बोललो, किंव्हा असं काही केलं जे कायदा प्रमाणे - तर्कसंगत नसेल - तरीही शांतता मिळत
नाही. ह्याविचारांनी मला पुढचा रस्ता दाखवला : जीवनी करता प्रयास हे फक्त जिवंत राहायकर्ता
असतो - ह्याचा मनाशी काही संबंध नाही. हो, याच्या उलट खऱ्याअर्थाने शांत मन ठेवून जर
जीवनी चे प्रयास केले तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्तं ठरते! हा विचार इथेच सोडू, नंतर ह्या बिंदू ला बघू.
अपण तीन विचार पुढच्या करता ठेवले आहे : कर्माचा
खेळ; सतगुणात कसं राहायचं आणि शांत मन + सतगुण चा जीवनी शी संबंध {स्वतःला आठवण देण्यासाठी
बिंदू ठेवत आहे लेखातच }
अता प्रश्न हा आहे कि ह्यासगळ्या पूर्वोक्त जागी किंव्हा
अवस्थेत मला शांतता कां बरं मिळते? असं काय असतं ज्यामुळे शांतता भेटते? माझ्या मनात
काय चाललेलं असतं ह्या अवस्थेत किंव्हा जागी? आणि सर्वात मोठी गोष्टं हि कि काही फायदा
होतो का? हा ठरला माझा व्यक्तिगत प्रसंग -
पण अपण ह्या प्रसांगातुन एक मार्ग, एक वाट निवडू
शकतो, ज्यानी तुम्ही आणि मी अपण दोघे हि शिकू शकतो आणि आपापल्या कर्मांना नवीन
वाट देऊ शकतो ... पण हा दरेक प्रश्न सोपा नव्हे - ४ वर्ष झाली - नुकतीच मला वाट दिसायला
लागली आहे. हे माझे लेख हीच वाट संपूर्णपणे माझ्या सवई मध्ये घेण्याचा एक मार्ग निवडला मी. हे लिहिण्या च्या
मागचा खरा अर्थ - लिहिण्या नंतर हि गोष्ट माझ्या अनंतरमानात छापून येईल. हि असते लिहिलेल्या
शब्दांची शक्ती. चौथ्या भागात अपण शांत मन म्हणजे काय - एक-दोन परिस्थिती च सविस्तर
विश्लेषण करू - रामकृष्ण आश्रम आणि स्वामी समर्थ मंदिर. कर्म अपण नंतर बघू. ह्या दोनी
संदर्भात मन कां बरं शांत होतं हे समजायचा प्रयत्न करूया ....
जर माझा हा प्रयाग म्हणजे गीता वरती विवेचन : स्वतःच्या मनावरती होणाऱ्या
बद्दल सांगून - आवडला असेल तर पुढचं लेखन देखील नक्की वाचा;
share नाही केलं तरी चालेल!
Comments
Post a Comment