अपण एकटेपणाला इतकं घातक किंव्हा काळजी ची
गोष्टं कां समजतो? ठीक आहे, माणूस समाजात राहतो; समाज हा माणसाचा फारच उत्कृष्ट अविष्कार
म्हंटलं तरी चूक नाही. पण ह्या गोष्टी चा हा अर्थ नाही के एकटेपणा वाईट असतो. तो वाईट
आहे कि नाही हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक
प्रश्न पडतो. पण माणूस - मग तो कोणी कां नसो, एकटेपणाला घाबरतो - आणि कोणाला कोणच्या
क्षणी एकटेपणा आवडत असेल तर हमखास लोक काळजी पूर्वक विचारतात. जे खऱ्या अर्थात आपुले
असतील ते नुसतं विचारतात; बाकी लोकं मज्जा घ्यायच्या अंदाजात किंव्हा स मनोचिकित्सकीय रोग असल्याची टिप्पणी
करतात. एकटेपण हे काही मानसिक रोग नाही; त्याचे पुष्कळ कारण असू शकतात.
चित्रपट व संगीत जगत चा पण ह्याच्यात फार मोठ्ठा
योगदान आहे. एकटेपणाला त्या लोकांनी एक दुःखद
प्रसंगाची जागा दिलेली आहे; म्हणजे माणूस एकटा दिसला तर समजावं कि तो दुःखीच असणार!
ते गाणं लक्ष्यात येतं मला : माझ्या मना आता
पुन्हा शोधू नको भरती जुनी लाटा जुन्या... जोडू नको तुटला दुवा मागू नको मिटल्या खुणा...
एकटा मी एकटे मन एकटी स्पंदने... स्वप्न आले स्वप्न गेले स्वप्न झाले जुने... सारे
सुने... ! नक्कीच तुम्हाला पण मराठी किंव्हा हिंदी मध्ये पुष्कळ गाणी आठवत असतील
हे वाचून! शेवटी काय तर माणूस एकटा दिसला रे दिसला - तर तो शंभर टक्के दुखी प्राणीच
आहे!
ह्याचा दुसरा पहलु पण आहे : संसारात अपण सर्व
रमलेले असतो - आपल्या लोकांमध्ये, आप्ल्या जीवनात. आप्ल्या बायको पोरांमध्ये, आप्ल्या
आई वडिलांमध्ये. आप्ल्या भाऊ बहिणींमध्ये, आप्ल्या मित्र-मैत्रिणींमध्ये. ह्या सगळ्यात
आपण स्वतःसाठी जगायलाच विसरतो. त्यावर नौकरी आणि पैश्या च्या गरजेमुळे जो थोडाफार वेळ
भेटतो तो आपण ऑफिस मध्येच! आणि जरकि आपण खूप खूप committed असाल तर ऑफिस आणि आप्ल्या
लोकांचा वेळ उलट होतो - ऑफिस मध्ये १४ तास व घरी २ तास. बाकी झोप आणि ऑफिस ची तयारी!
हे काय जगणं, ह्याचा काय अर्थ? ठीक आहे, कबूल करतो कि पैश्या विना काहीच मार्ग नाही
आजच्या जगात; पण पैश्यापायी स्वतःला विसरणं हे कुठवर शहाणपणा म्हंटलं जाऊ शकतो?
खरंतर हे अपण म्हणू नाही शकत कि माणूस आजकाल
फक्त कुटुंबासाठी जगतो; नात्यांमध्ये भेटी कमी होत चालली आहे, भाऊ बहिणी सुद्धा भेटू
नाही शकत. आधी असं नव्हतं. भेटी आणि आपुलकी दोनी कायम होत्या. पण आता ते नाही, भेटी
तर होतंच नाही - त्याच शेहेरात राहून सुद्धा लोकं एकमेघाला भेटत नाही - मग ती सक्खी
असो किव्हा चुलत. नात्यात गोडवा कमी झाला असं माझं म्हणणं नाही - गोडवा तर अजूनही आहेच
- पण त्या गोडव्याचा खरा खुरा श्रेय जातो आपल्या आई वडलांना, जे नेहेमी भेटत राहिले.
लोकांना हे नाही कळत, हि जाणीव नाही आली आहे के आधी च्या काळी कुटुंब जोडवे असायचे
व मोठे असायचे. आता तसं राहिलं नाही - आप्ल्या पोरांची नाती कशी राहतील हे कुणीच विचार
करत नाही! असो. हा माझ्या लेखाचा उद्देश्य मुळीच नाही! सगळ्यांची अपली इच्छा, सुखी
रहा एवढंच पुरेसं आहे!
मुद्दा शेवटी हा आहे - तुटत्या नात्यांमध्ये,
पैश्या च्या माघे पळण्यामध्ये, संसारात अपण एक मोठी वस्तू विसरत चाललो आहे. ती वस्तू
म्हणजे अपण स्वतःला विसरत चाललो आहे. आणि ह्याचा इलाज तो वेस्टर्न मी time नव्हे -
एकटं चित्रपट बघून किव्हा एखाद वेळी मित्रांसोबत दारू पिणे म्हणजे मी time नाही! अपण
स्वतःकरता काय करतो - स्वतःच्या विकासा साठी? माझा तात्पर्य अभ्यासाशी मुळीच नाही.
स्वतःच्या मनाचा उधार करण्यासाठी अपण काय करतो? काहीच नाही. आपणहून तर अज्जीबात नाही.
आणि स्वतःच्या मनाचा, अंतर्मनाचा उधार करण्यासाठी आपल्याला ह्या संसारातून बाहेर पडावं
लागेल - एकटेपणा स्वीकार करावा लागेल. त्या क्षणी,जेम्व्हा तुम्हाला तो एकटेपणा बोलायला
थांबेल आणि तुम्ही एकटेपणाला घाबरणं बंद कराल,
त्याला आवडीने स्वीकारणं शिकाल - तेम्हा तुम्हाला तो एकटपणा जाणवणं थांबेल. आणि तो
तुमच्या शी संवाद लावेल. तो संवाद ऐका - तो तुमच्या अंतर्मनाचा, तुमच्या आत्म्याचा
आवाज असेल.
त्या आवाजाला सुद्रुढ करणं शिका, तुम्हाला
स्वतःची वाट आपोआप दिसेल. तुम्हाला नात्यांची गोडी कळेल, आप्ल्या चुका कळतील व दुसऱ्यांच्या
चुकांना गांभीर्याने नाही घायचं हि जाणीव मिळेल. तेथे तुम्हाला मनाची प्रसन्नता मिळेल
- कारणकी लक्ष्यात ठेवा - अपण एकटे आलो ह्या जगात, आणि एकटेच प्रयाण करणार इथनं. कुणी
पण तुमच्या बरोबर येणार नाही - बायको सुद्धा नाही. पण आपुले कर्म - ते नक्कीच आप्ल्या
बरोबर येतील. आणि कर्म म्हणझे पैशे कमवणं नव्हे. कर्म म्हणजे आपली संपूर्ण जिम्मेदारी
- सगळी नाती, सगळं प्रपन्च आणि तुम्ही कशे राहिला ह्या प्रपंचात सगळं फारच महत्वाचं
ठरेल. एकटेपणाला स्वीकार जर मनापासून आवडीने केलं तरच मनाची दारं उघडतील. दुसरी वाट पण आहे, अर्थात - पण हि
सोपी वाट आहे. दुसऱ्या वाटी ला खूप कष्ट येतात...
Comments
Post a Comment