माणसाला एक अशी जागा हवी असते ईथे पोचून मन अगदी स्थिर हुन जातं ... जिथे मन, अंतर्मन, विचार, इच्छा, राग व द्वेष सगळा शून्य होतो. अश्या जागी खऱ्या अर्थाने आपण आप्ल्या स्वतःला समजू शकतो ... मनाचे खरे बोल ऐकू शकतो. अश्या जागी ब्रह्माण्ड नसतं; काही असतं तर ते फक्त खऱ्या अर्थात आपण, आपले खरे विचार, आणि एक अशी ताकत ज्याचा आप्ल्याला फक्त भास होतो, पण डोळ्यांनी काही दिसत नाही. हि जागा फक्त मनाच्या डोळ्याने दिसते... असते ती खऱ्या अर्थात आप्ल्या श्रद्धे मध्ये; आप्ल्या श्रद्धेतून उगवणारी जागा. पण ती जागा एकदाची भेटली ह्या बाह्य जगात, तर समजावं कि आपण जगाचा मायाजालमधून बाहेर पाडण्याकडे पहिला पाऊल घेतला!
मी श्रीमद भगवद गीता ३ किंव्हा साडे तीन वर्ष्यापासून रोज वाचतो. माघे मी म्हणालो होतो कि हा प्रवास कसा सुरु झाला मला ठाऊक नाही. पण झाला तो सुरु. हळू हळू रमू सुद्धा लागलो... आवडायला लागलं, आणि मग सवय झाली! आता कधी-कधी असं वाटतं कि गीता वाचून मी शांत होतो, एवढंच नाही, अंतर्मना पर्यंत शांतता पसरते; मरण्याची आणि जगायची भीती सुद्धा जाते. खरं तर उत्सुकता होते कि मारण्यास काय होईल कळेल तर खरी, तर घाबरायचं कश्यामुळे? हि तर चांगली गोष्टं ठरेल! भीती जर वाटते तर ती फक्त एकाच गोष्टी ची - मी काही असं कर्म नाही तर केला ज्यामुळे पुनर्जन्म होईल? नको मला, आता पुरेसं झालं .... ह्या संपूर्ण मायामधुन बाहेरची वाट हवी. एवढीच भीती राहते मनात गीता वाचताना.
कर्माचा हा खेळ आपण इथेच सोडू - पुढच्या भागामध्ये पाहू हे असतं काय. सध्या इतकच पुरे कि कर्म जी मला करायचे आहे, ते शुद्ध असायला हवे; खोटेपणा अजिबात नको. मग तो कर्म काही सुद्धा कां नसो. कुणाचा कर्ज नको; कुणाचा उपकार किंव्हा तिरस्कार नको. माझ्याकडून कुणाचंसुद्धा मन दुखावलं जाईल असे देखील नको. स्वतःची, घराची व खानपान ची स्वछता राखावी मी, आणि कुनाशीसुद्धा द्वेष किंव्हा राग नको. तोंडातनं जे शब्द बाहेर येतील ते जितकं जमेल पाळावे. जर मनात नसेल तर आपण तोंडानी बोलावे नाही, मग ते मित्र असो वा शत्रू, व्यवहार असो वा जीवनी चा संबंध. एकदा बोललो तर गोष्टं संपली. हे करणं लिहिण्या इतकं सोपं नाही ह्याची जाणीव आहे - कधी कधी माघार घ्यावी लागते, कधी कधी चुकतो देखील. पण मनापासून एकच खरी इच्छा असते - कि हे सगळं मी आपल्या व्यवहारात आणि जीवनशैली मध्ये पार पाडावं!
हि वाट जी मी धरली आहे, कष्टेची आहे - देवाकडून हीच अपेक्षा कि सफल होण्यात मदत राहावी! पण ह्या जगामद्ये जगावं तर लागतं.... पैशे कामविण्या साठी बाहेर पडावं लागतं. आणि जगात गीता चा अनुसरण खऱ्या अर्थात करणारी किती लोकं आहेत - मी स्वतः सुद्धा कुठे पाळायचो पूर्णपणे, स्वेच्छे ने आणि मनापासून? हे तर हल्लीच, मागच्या ४ वर्ष्यांपासून सुरु केलं.आधी पण प्रयत्न हाच असायचा कि काही चूक नको, जे काम माझ्या हातून पार पडेल ते स्वछ असावं. पण त्याचा मागच्या अर्थाची जाणीव किंहवा अक्कल नव्हती. अशामुळे पुष्कळदा चुका देखील घडायच्या - मुद्दाम नाही, पण चूक घडायची माझ्यापासून. अश्या जगाच्या कोलाहलात आपण इतके रमतो किंव्हा अडकून जातो कि ह्याच्या कडे लक्षं जातच नाही. हे नवल नाही - जीवनी कमविण्यात, नाते पाळण्यात व फक्त जगण्याच्या मजेत ह्याकडे लक्षच नाही आपलं.
मग ह्या कोलाहलातनं बाहेर पडायचं तर कसं? जगाचा कोलाहल आणि हल्ला तर कमी होणार नाही. आपल्यावरती जी जिम्मेवारी आली आहे ती पण पार पाडल्या शिवाय सुटका मिळणार नाही - कारण आपणच असंतुष्ट राहू! अशा विचत्र खेळ आहे जीवनाचा! शिवाय ह्यासगळ्या प्रपंचात अपल्या लक्षात सुद्धा येणार नाही कि कधी मारायचं आहे, देवाच्या विरुद्ध काही केलं तर अपयश मिळेल आणि किंमत द्यावी लागेल. सुटका मिळणार कसा जेम्व्हाआपणच गुंतून बसलो आहे ह्या मायेशी? आणि ती माया आहे तर तिच्यातून बाहेर पडणं इतकं सोपं सुद्धा नाही. ह्याचा इलाज काय? ह्याची मला कल्पना नाही. कधी झाली तर सांगीन - माझ्या लेखन मध्ये, हे नक्की! आता मग प्रश्न हा पडतो कि माझ्या लक्षात ह्या गोषटी आल्या तर कुठून? माहित नाही - खरंच. अज्जीबात कल्पना नाही. पण आल्या मनात. खरा प्रश्न तर हा कि एकदा अशे प्रश्न सुचले कि त्यांचं उत्तर कसं शोधायचं?
उत्तर शोधणं त्रासेंचि काहीच गोष्टं नाही खरं तर - पण हि प्रश्न सोपी नव्हे. खूपच कुटील प्रश्न आहे. ह्यांचं उत्तर आपल्याला पुस्तकांमध्ये तर नाहीच भेटणार, कुणाला विचारूनसुद्धा अर्थ नाही. ह्या जगात कुणी ऐकेल का अशे प्रश्न अपण विचारले तर? प्रॅक्टिकल लोकांना कळणार सुद्धा नाही - आणि जरी कळले तरी दुर्लक्ष करतील, मनातच दाबून देतील व म्हणतील कि अरे सोड नं, काय लावून ठेवलं आहे? आपल्या जॉब कडे लक्ष राहू दे, सोड हा प्रपंच. उत्तर मिळतील - पण प्रयत्न करायला हवा; कष्ट केल्या शिवाय काहीच हाती येणार नाही! पण अश्या जटिल प्रश्नांचे उत्तर शोधायला जे हवं ते कुठे मिळेल? हे ठरले मनाचे प्रश्न; जर मनात कोलाहल असेल तर उत्तर सुचणार कुठून? जगाचा कोलाहलात अश्या जागा आहेत का? कारण उत्तर शोधायला मन शांत हवं; आणि शांतता कुठून आणि कशी येईल आपल्या मनात हे आपल्याला शोधायला हवं ... आणि हाच माझा शोध आपण पुढच्या भागात वाचू!
Manaala, tumcha ha post vachun anand vaatla _/\_
ReplyDelete