आप्ल्या जीवनाचा अर्थ काय आहे? जन्म घ्यायचा, शिक्षण घ्यायचं, मग नौकरी आणि लग्न. पोरं मोठी करायची, मग त्यांचं लग्न - आणखी मग शांतपणे रिटायरमेंट काढायचं देवाघरी जाई पर्यंत... एवढेच? हे तर सगळेच करतात, मग आपण असं काय वेगळं केलं? आपण ह्या जगात काय फक्त हेच करायला आलो आहोत का? जगाचा अर्थ, तात्पर्य काय एवढाच होतो? जर असच होतं, मग तर ह्या मायेचा काहीच विशिष्ट अर्थ निघत नाही ... जन्मापासून परेपर्यंत हा प्रवास काही अर्था चा असेलच - नाहीतर हे सगळं जग इतक्या सुरळीत चाललं नसतं, हे तर नक्कीच!
मी ह्याचा खूप खूप केला - पण अर्थ कळेना ... खूप लहान असताना मारण्याची भीती वाटायची; ती भीती मोठेपणी पर्यंत बरोबरच राहिली. पण जागायच्या भानगडीत ह्याविचाराला पुढे वाढवू शकलो नाही! खूप लहान असताना माझ्या मनात हा विचार यायचा कि मेल्या नंतर नक्की काय होतं - अजून जन्म असतात का? ह्याचा पुढे वाढलोच नाही एक प्रसंग आला होता, जेम्हवा मी श्रीमद भगवद गीता वाचायला घेतली - ग्वालियर ला राहताना. तेम्हवा मी १४ वर्ष्याच्या होतो; खरंतर १४ पण नाही : १२ म्हणा कारण हि गोष्ट घडली असेल १९८३ साली. दुर्दैवाने मी ह्या सवयीला चालू ठेवू शकलो नाही, आणि हे वाचन माझं सुटलं आपोआप... कारण माहित नाही.
मग जजिन्यात असा रमलो, असा रमलो कि सगळं विसरून गेलो, आणि जीवनाच्या मायेमध्ये असा गुंतलो कि बाकी इतर विचार करता मनात जागा नव्हती, नाही वेळ दिली मी कि जागा तयार होईल. पण जीवनाचा खेळ बघा - ज्यापासून मी पळत होतो, किंहवा असं म्हणा कि जेथे लक्ष देत नव्हतो जीवन रेखानी तेथेच नेवून ठेवलं ... पुन्हा एकदा कारण मला अजूनही नीटपणे माहित नाही. पण माझं मन आपोआप पुन्हा त्याच श्रीमद भगवद गीता कडे गेलं ... आणि तिथून सुरु झाली माझ्या खऱ्या शिक्षणाची वेळ... गीता हुन कसं उपनिषद पर्यंत पोचलो कळले सुद्धा नाही. तात्पर्य हा कि सगळं आपोआप घडलं - मी आपणहून विचार करून केलेलं असेल असं नाही
लहानपणी - १२ वर्ष्याच्या असताना - गीता कशी हातात आली? ठीक - मारण्याची भीती होती; पण ती तर सगळ्यांना असतेच; मग गीता कडे अश्या वयात लक्ष कां बरं गेलं? मला माहित नाही. आणि असं कसं घडलं कि पुन्हा एकदा माझं लक्ष गीता कडे गेलं? मला नीट लक्ष्यात आहे, मी गणपती दर्शनाला गेलो होतो, इंदूरी मधील खजराना मंदिर मध्ये. तिथे मंदिराचा प्रांगणात गीता प्रेसचं दुकान दिसलं ... आतमध्ये शिरलो, आणि गीता व ९ उपनिषदयांचं पुस्तकं घेतलं . तो दिवस आहे, आणि आजचा दिवस आहे - रोज वाचतो. आधी उत्सुक्ते ने ... मग सवयी मुळे - तर कधी भीती मुळे, सवय सुटायला नको, किंव्हा देवाला दिसेल नाही वाचलं तर. मग ...हळू हळू, ह्या वाचनात रमायला लागलो ... मनापासून आवड निर्माण झाली
हि आवड कुठनं आली? असं कां आहे की मला हे वाचायला आवडतं - पण इतर लोकांना वेचायला विशेष ओढ नाही - कां? आणि वाचता वाचता हि इच्छा कुठून आली कि अजून पूज्य लोकांनी काय भाषांतर केलं आहे गीता च्या बद्दल? असं कां? मोठी गोष्टं म्हणजे अशी कि गीता वाचून मनाला कां बरं वाटतं? कां आणि कोठून मनात असीम शांतता उत्पन्न होते? असं काय आहे ह्या पुस्तकात? ह्या प्रश्नांचे उत्तर पूर्णपणे तर मिळाले नाही अजूनही ... पण आता हळू हळू जन्माला कां आलो हे थोडं फार कळायला लागलं आहे... हि वाट जी मी चालायला सुरु केली आहि कुठे जाते हे अजून तर नीट नीट माहित नाही - पण आता मनात एक उत्सुकता उत्पन्न झाली आहे - बघू तर सरी कि मनाला छान वाटणारी, अंतर्मनाला लाभणारी हि वाट कुठे जाते ... आशा भोसलेचं ते गाणं मनात लक्ष्यात येतं - हि वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा / माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
हा लेख आपल्या गीता प्रेमाविषयी मी चालू तर केला - कुठे जाऊन संपेल हे ठाऊक नाही. आवडलं तर नक्की वाचा... मराठी मध्ये ह्याकरता लिहितो आहे कारण ह्याच शब्दांना कागदा वरती काढू शकतो पुर्ण पणे ...
Comments
Post a Comment