पुलं ह्यांचं एक लेख - आणि मी
पुलं ह्यांचं एक लेख वाचताना माझ्या मनातही तेच विचार
उगवले... लेखाचे नाव कारवार. लेख आहे या पुलं
ह्यांच्या गावा चा उल्लेख - खरं तर त्यांच्या आई च्या माहेर चं गांव. ह्यात त्यांनी आपल्या लहानपणी च्या आठवणी सांगितल्या
आहेत - खूपच सजीव चित्रण केलं त्या लेखात. कधी गाठोडं ह्या पुस्तका वर टिपण्णी लिहिली
तर सविस्तर सांगेन.सध्या एवढंच पुरे. मुद्दा हा कि हे लेख वाचून माझ्या मनात पण विचार
आ- - माझं गाव. तिथवर तर ठीक - पण ह्यापुढे विचार काही ये ना. कारण मला प्रश्न
हा पडला - माझं गाव कुठलं? कोणच्या जागेला मी ह्या अधिकाराने म्हणू शकतो - हे गाव माझं?
मनात काही उत्तर येच ना. शून्य. निल बटे सन्नाटा!
खरंतर मी पुष्कळ ठिकाणी राहिलो - पण ग्वाल्हेर ला सर्वात
जास्त वेळ. त्या नंतर इंदौर. पण मनात दोन्ही जागांसाठी "हे माझं गांव" म्हणून
विचार येत नाही. कारण कुत ठल्या हि जागांतून आठवणी - कमीत कमी चांगल्या आठवणी - जोडलेल्या
नाही माझ्या मनात. कमीत कमी लहान्पण्याच्या तर अजिबात नाही. वाईट बातम्या पण नाही येत
लक्ष्यात - ती गोष्टं वेगळी. मुद्दा काय आहे - नुसतं मी जेथे जास्त वर्ष राहिलो तो
माझा गांव नव्हे; अपण जेम्हवा माझं गांव असं म्हणतो - त्यात पुष्कळ आठवणी जुडलेल्या
असतात; खूप गोष्टी विणलेल्या असतात; लहानपणी ची मजा असते; मित्र भावंडांशी गप्पा भांडणं
असतात ... आणि बरच काही. पण माझ्या मनात असं काहीच येत नाही!
ग्वाल्हेर ला जायचो - नेहेमीच; पण अश्या काहीच आठवणी मला वेचता आल्याच नाही. कारण एक तर मी शेंडेफळ;
आणि त्यात शांत स्वाभाचा - आणि आई बाबांचा लाडका. तिन्ही गोष्टींमध्ये माझी काय चूक?
पण ह्यासाठी एखाद दोन नातेवाईकं खूप चिडवायचे, किंव्हा तिरस्कार करायचे... किंव्हा
इग्नोर. हा तिसरा पर्याय मला खूप आवडायचा - मी इथे नाही असं समजा; अगदी मस्त! मी खुश
तुम्ही पण खुश! इंग्रजीत ज्याला परफेक्ट म्हणता येईल अशी स्थिती! पण हे तेम्हा सांगता
आलं नाही... मोठा होत गेलो ... नाती जवळची जोडली गेली सगळ्यांशी - म्हणून आता नाही
सांगता येत! पण पुन्हा -मुद्दा काय घेतला अपण
- माझं गांव कुठलं? ह्याचा उत्तर नाहीच मिळाला! मी जिथे चा तिथेच!
मग हळू हळू लक्ष्यात यायला लागलं ... माझं गांव होतं
जिथे मला प्रेम मिळालं. जिथेही प्रेम मिळालं - आपुलकी मिळाली ... तेच माझं गांव! आई
बाबांच्या जवळ राहताना जिथे राहायचो ते
स्थळ नाही - ते शहर नाही..... आई बाबांच्या बरोबर ची जी जागा होती - ते माझं खरं गांव.
तिथे मला प्रेम भेटलं - नैसरगिक प्रेम, विना काही अपेक्षा... तसं प्रेम मला पुन्हा
भागी आलंच नाही, फक्त माझी बहीण - आणि मोठा भाऊ. दोन्हींनी मला कधीपण रत्तीभर सुद्धा
त्रास दिलेला नाही. त्रास नाहीच - कपाळा वर
आठ्या सुद्धा येऊ दिल्या नाही. अजूनही तसेच आहे... आणि तसंच हवं. प्रेम जिथे - तिथे
मुक्काम. तेच खरं घर आणि तेच खरं गांव.
अर्थ काय होतो - मला जागेशी किंव्हा जागेची काही सुद्धा
ओढ नाही. मी प्रेम पुजारी - ह्या जगाच्या नैसर्गिक वस्तूंशी प्रेम करणारा माणूस! संपूर्ण
आयुष्य भराच्या आठवणी आज बघितल्या - नाती वा प्रेम शिवाय काहीच आठवे ना. असं नाही
कि वाईट प्रसन्ग विसरलो - मी साधारण पणे काहीच विसरत नाही - ज्यांनी त्रास दिला - छोटा
किंव्हा मोठा - सविस्तर लक्ष्यात ठेवलं आहे मग ते नातेवाईक असो किंव्हा इतर लोकं. पण
त्या आठवणींचा आता त्रास नाही होत - आणि त्या लोकांशी वाईटपणा सुद्धा नाही मनात. विसरायचा
प्रयत्न चालू आहे - बघू या. विसरणं खूप गर्जे चं आहे ह्या जगात! पण कितीजरी प्रयत्न
केला - कोणचीपण जागा आठवेच ना! मद्रास मध्ये ताई आठवते; मामा - आई - बाबा - दादा -
सगळे आठवतात; जागा नाही. तसेच ग्वाल्हेर असो किंव्हा इंदौर!
ह्या प्रकरणावरून एक कळलं - माणूस जागेला किती अती महत्व
देतो? कां म्हणून? असं काय आहे त्या जागेत, त्या घरात, गावात? तुमची नाती हटवा त्या जागातून - काय शिल्लक राहिलं? काहीच नाही!
शून्य पण भारी पडेल! महत्व जागे चा - घराचा कधीच नसतो. महत्व नातेवाईकांचा हि नसतो.
ते आज आहे उद्या नाही. महत्व असतो आपण कशे वागलो, प्रेमाने कि तिरस्काराने,या मग दुर्लक्ष
करून किंव्हा छोटं समजून? तुम्ही किती बोलला किंव्हा नाही बोलला ह्याचाही काहीच अर्थ
नव्हे; माणूस बोलतो आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी, भुवयांनी, सगळ्या अंगांनी, अंतःकरणातनं
आणि विचारांनी. हो - विचार ऐकू येतात - हि चूक मुळीच करू नये - तुमचे विचार लोकांना
ऐकू येतात. ऐकणारा हवा त्यासाठी!
पण हे सगळं, आपलं स्वतःचं नैसर्गिकपणा विसरून अपण भौतिक
वस्तूंशी प्रेम करून बसतो! पैसा, घर, डिग्री, - हो, नातेवाईकं सुद्धा, गांव आणि बरच
काही. ह्यांच्यात काय अर्थ आहे? विना प्रेमाचं काय शिल्लक उरतं? शून्य! तुमचा पैसा
आज तुमचा आहे - उद्या नाही;. तुमची नाती आज आहे - उद्या नाही. शेवटी तुम्ही एकटेच.
काय शिल्लक राहणार? फक्त आणि फक्त तुमचे विचार, तुमचे शब्द, तुमचं प्रेम, आणि तुमचं
वागणं. बाकी सर्व व्यर्थ चेष्टा असतात. कबूल आहे - मी पण चुकलो असिन पुष्कळ जागी; माझ्या
चुकांनी वरती लिहिलेलं सत्य बदलू शकत नाही... ते दोन हिंदी गाणं नेहेमी लक्ष्यात ठेवा
- इन्सान का इन्सान से हो भाईचारा, येही पैगाम
हमारा ~ एक दिन बिक जायेगा माटी के मोल जग रेह जायेंगे प्यारे तेरे बोल! म्हणून चांगलं
विचार करा; प्रेम ठेवा; तिरस्कार मुळीच करू
नका - एकदा दुर्लक्ष केलेलं चालेल, पण तिरस्कार असहनीय असतो; बाकी काय उरतं?
शून्य! एक दिवशी तुम्हाला मला दोघांना प्रयाण करायचाच आहे... हे कधीपण विसरू नका
...
Comments
Post a Comment