व्हाट्स अप लग्न पाहून पहिला विचार आला के हे चित्रपट छान होतं पण उत्कृष्ट नाही म्हणून मी ह्याच्या बद्दल लेख नाही लिहिलं तरी चालेल ... पण मग मनात विचार आला कि जरी काही चुका होत्या तरीपण गोष्टी मध्ये आणि अभिनय मध्ये बांधून ठेवणारं पुष्कळ काही होतच. शिवाय संगीत तर छान होतच आणि सर्वात मोठी गोष्टं म्हणजे अशी कि हि गोष्टं आजच्या काळा बद्दल होती, आजच्या पिढी च्या बद्दल होती, त्यांचा {अर्थात आमच्या } जीवनाच्या बद्दल होती. ह्या कर्णनांमुळे मी हा लेख लिहिण्या चा विचार केला. अशी गोष्टं जी आजच्या काळाबद्दल
आहे, आणि आजकालच्या विचित्र पण स्व-रचित निरनिराळे प्रॉब्लेम्स बद्दल आहे, जी इतके
सटीक व सजीव चित्रण करून ठेवते आपल्या जीवनाचा - अश्या गोष्टी ची कहाणी आणि अश्या चित्रपटाचे
विवरण सगळ्यांना कळायला हवे... असे माझं मत असल्या मुळे ह्या चित्रपटाचा विवरण माझ्या
उत्कृष्ट
मराठी चित्रपटांमध्ये पोचला
हि कहाणी आहे दोन अश्या पात्रांची जे अगदी दोन टोकाचे लोकं आहे, दर बाबतीत. मग ते सवई असो किंव्हा काम असो - पूरब पश्चिम, उत्तर दक्षिण, अगदी दोन निराळे टोकं. त्यांच्यात काहीच साम्य नाही; माणूस असतो अति व्यवस्तीत राहणारा, तर मुलगी असते अस्त व्यस्त; हा आहे जवाबदार तर ती आहे गैर जवाबदार .. आणि हा आहे सकाळ ते संध्याकाळ ऑफिस मध्ये काम करणारा इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी चा अधिकारी - तर ती एक उभरती नट, एक कलाकार. ह्यांचा मध्ये प्रेम उत्पन्न होतं .... आता हे कसं होतं त्याच्यात काहीच अर्थ नाही. प्रेमाचा कारण अजूनपर्यंत तर कोणालाही कळलेला नाही. इथे तुम्ही पहिली चूक म्हणू शकता; हे संपूर्ण प्रकरण - प्रेमाचं - थोड्यात संपू शकत होतं ... पण उगाच खेचलं सारखं होतं. थोडक्यात ह्याच्या खऱ्या गोष्टी शी काहीच जोड नसल्यामुळे चित्रपटाचा गोष्टी मध्ये बंध थोडा कमी होतो; जरी काही क्षण अशे आहे जे फार मन लावून घेतात, पण मुख्य गोष्टी शी तारतम्य नसल्यामुळे इफेक्ट थोडा कमी होतो. आणि ह्यामुळे स्क्रिप्ट ची पकड थोडीफार सुटते ...
असो. अपण पुढे चलू. लग्न होतं ह्या बेमेल जोडीचं ... आणि आता सुरु होते खरी गोष्टं! इथे लग्न होतं - आणि तिथे दोघांच्या जीवनात सर्वस्व बदलतं. दोघांना आपापल्या कामात उत्कृष्ट वाट मिळते - अगदी दोन टोकांची ... जयाच्या मुळे दोघांचे संपर्क कमी होत जातात. मुलाला प्रोमोशन झाल्या मुळे आणि युरोपियन बिसनेस मिळाल्या ममुळे रात्री बाहेर राहावं लागतं; आणि बायको ला एक खूप चांगला रोल मिळतो सिरीयल मध्ये. ती दिवस भर कामात, तो रात्री कामात... आणि सुरुवात होते कष्टांची त्यांच्या दोघान मध्ये. सुरुवाती चं निमित्त मिळतं तिच्या गैरजीम्मेदारपणा मुळे; आग लागते त्याच्या कामा मुळे , जेव्हां तो सगळं विसरून कामाच्या माघे लागतो. हळू हळु बोलचाल कमी होत जातो दोघं मध्ये, आणि सुरु होतात नवऱ्या बायको ची भांडणं ... पुढे गोष्टं आहे कि कशे हे दोनी ह्या संपूर्ण चाक्रव्हुहरचने मधून बाहेर पडतात
तर अशी हि गोष्टं आहे ह्या चित्रपटाची... स्क्रिप्ट मध्ये एक मात्रं आहे - पात्रांचं चित्रण खूपच चांगलं मांडलं गेलं आहे ... त्यांच्या सवई चं सटीक उल्लेख आहे , आणि त्याचं पुढच्या गोष्टींशीसुद्धा जोड मिळतो ... ह्याचा असर संपूर्ण चित्रपटाचा वरती होतो - जेंव्हा शेवटी एकोणेक छोट्या मोठ्या गोष्टी जुळून येतात, आणि एक पूर्ण चित्रं निर्माण होतं आपल्या मना सामोरी. हि काही छोटी गोष्टं नाही - लेखक नि सगळ्या मुख्य पात्रांचं चित्रण, त्यांच्या सवई आणि त्यांचे विचारानं पुढची गोष्टं निर्माण केली आहे; खऱ्या जीवनात पण तसच घडतं - छोट्या गोष्टीच उभारून मोठ्या वाटू लागतात, हे शंभर टक्के सत्य आहेच!
चित्रपट पुष्कळ जागी आपल्याला वाटत राहतं कि इथे काही चुकलं स आहे, इथे काही कमी आहे... काही काही सीन खूप खेचले गेले पहिल्या भागात ... प्रेमाचं प्रकरण थोडं नीट सावरलं असतं तर खूप छान असर झाला असता. पहिल्या भागामध्ये ह्या मुळे थोडी ओढ कमी वाटते. पण खर्यामानाने दुसऱ्या भागात चित्रपटाची ओढ वाढते, आणि सर्व पात्रं आणि कहाणी सजीव होते ... नात्यातले तार सुटण्याचा आणि त्यांच्या पुन्हा जुळुन येण्याचा प्रसंग फारच मोहक ठरतो, आणि चित्रपटाला वाचवतो. प्रार्थना बेहेरे आणि वैभव तत्ववादी चा अभिनय खऱ्या अर्थात ह्या चित्रपटाचा मणी ठरतो - उत्कृष्ट अभिनय! निर्जीव पहिल्या भागाला सुद्धा हे दोन्ही वाचवतात - आणि दुसऱ्या हिश्यात तर काय म्हणावं! उत्कृष्ट अभिनय - दोन्ही नि खूपच छान अभिनय केलं. तसं हे काही मोठी गोष्टं नाही - प्रार्थना आणि वैभव च्या कामाची कल्पना आपल्याला आधी पासूनच आहे. संगीत छान आहे - बांधून ठेवतं.
खरं म्हंटलं तर हे चित्रपट अपल्या मॉडर्न जीवनाचं आहे - हे बघून एकाच विचार येतो; हे सगळं आपण का बरं करत बसतो? कश्या साठी? विक्रम गोखले चं ३ मिनिटांचं भाषण अगदी बरोबर आहे - खऱ्या जीवनात सुद्धा. आपण आजकाल पुढे वाढण्या च्या पायी आपुलकी विसरून बसतो; आपली माणसं विसरतो; स्वतःला विसरून बसतो - हे सगळं कश्या मुळे? कोणा साठी? मान्यं आहे कि आता काम इतकं सोपं राहिलं नाही - वेळ द्यावा लागतो. हि प्रॅक्टिकल गोष्टं आहे - पण काय अगदी एका टोकापर्यंत नेणं काय खरंच गरजेचं आहे? काय आपण वाट - मधली वाट -नाही शोधावी? ह्या प्रश्नाचा उत्तर दर माणसांनी सवतः द्याचा आहे...
Comments
Post a Comment