मी हंपी च्या रिव्यू मध्ये म्हणालो होतो कि "शांतता बोलते" - ते मात्र एका संपूर्ण चित्रपटा बाबत होतं ... आजच्या चित्रपटात अर्थात "आम्ही दोघी " मध्ये पण शांतता बोलते ... पण ती फक्त एका उत्कृष्ट अभिनेत्री मुळे : मुक्ता बर्वे - ज्यांच्या अभिनय च्या पाठी वरती हे चित्रपट ह्या वर्ष्या च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादी मध्ये आपोआप सहज रीती ने पोचलं ... खूप वेळा नंतर एक चित्रपट बघितलं ज्याच्यात एका पात्रामुळे सर्व चित्रपट उजळून आलं ... खरंच, मुक्ता च्या अभिनय नि मलातरी अवाक करून दिलं ... माझ्या कडे शब्द नाही उरले तिच्या ह्या अभिनय चे वर्णन करायला! तुम्ही जर माझे इतर रिव्यू वाचले असतील तर हि जाणीव सहज होईल, कारण इतर रिव्यू मध्ये मी नेहेमीच गोष्टं किंव्हा संपूर्ण चित्रपटा बाबत वर्णन करून सुरु करतो; पण आज - माझ्या कडे फक्त मुक्ता बर्वे ह्यांच्या अभिनय साठीच सुरुवाती चे शब्द येत आहेत ...
ह्या वरती लिहिलेल्या वचनांचा हा अर्थ नाही कि बाकी लोकांचे अभिनय चांगले नव्हते ... किरण करमरकर आणखी प्रिया बापट निसुद्धा पुरज़ोर सपोर्ट केला आहेच मुक्ता चा. हे म्हणणे चूक नाही ठरणार कि आम्ही दोघी खर्या अर्थात ४ उत्कृष्ट कलाकारांचा कमालीचा प्रयोग आहे. हे चार म्हणजे मुक्ता बर्वे, प्रिया बापट, किरण करमरकर आणि दिग्दर्शक प्रतिमा जोशी ... ह्याच्यात भूषण प्रधान ला हि जोडलं तर चूक नाही... खरंतर भूषण ला एवढा मोठा रोल नव्हता, पण एक खूपच महत्वाचा रोल ठरला ... ह्या पांच लोकांनी मिळून एक असे सुंदर चित्रपटच निर्माण केलं कि खूप दिवस लक्ष्यात राहील... मनापर्यंत विदीर्ण करणारी गोष्टं ... तरीपण ओढ लागते ... sheer
magic ! प्रिया बापट च्या अभिनय मध्ये एक बारीक गोषट पुष्कळ कमालीची वाटली - ती म्हणजे वयाबरोबर होणारे बदल - आणि तिचे वागणे कसे मॅच्योर होते हे बघण्या सारखं होतं. अर्थात, दिग्दर्शक आणि इतर लोकांचाहि ह्यांचात मोठा हात होता, तेही खरं
गोष्टं खूपच सादी आहे - एक वडील दुसरं लग्नं करतात ... आपल्या पोरी ला काहीच ना सांगता! इथून सुरु होणारी गोष्टं पुढे पण साधीच राहते ... आणि सुरु होते एक मनाला विदीर्ण करणारी, ओढ घेणारी, आपल्या अंतर्मनापर्यंत पोचणारी आणि अविस्मरणीय छाप सोडणारी गोष्टं, ज्याला विसरणं सोपं नाही. कुठे आणि कसं ह्या दोनी - मुक्त आणि प्रिया दोनाचे एक होतात अशी हि गोष्टं नव्हे. इतकीपण सोपी नाही बरं! कथानक पुढे वाढतो ... पोरगी मोठी होता होता मतभेद सुरु - वडील आणि पोरीच्या मध्ये! किरण करमरकर च्या अभिनय मुळे हे संपूर्ण प्रकरण दर्शकांना खूप ओढून घेणारा ठरतो - आणि हळू हळू - खूप हळू हळू मुक्ता चा चार्वस्व मुली वरती वाढत जातो ... एकही वाक्य बोलल्या विना - हे सांगणं सर्वात गरजेचं. फक्त डोळ्यांनी, चेहराचा हावभाव नि आणि शुद्ध अभिनय नि. मी सांगितले नं - शांतता बोलते. खरंच, शांतता बोलते - आणि जेव्हा शांतता बोलते, ते विसरणं अशक्य ठरतं ..
कथा व दिग्दर्शन बाकी सगळं चांगलं आहेच ... पण सगळ्या पात्रांचा अभिनय मुळे त्याची ओळख हळू हळू जाणवते ... अश्या उत्कृष्ट अभिनय मुळे गोष्टी ची आणि पात्रांचा चित्रण ची सुंदरता लवकर ओळखू येत नाही!. ह्या चित्रपटाचा दुसरा कोण म्हणजे पात्रांचं चित्रण जे लेखकांनी केलं आहे ते फारच वरच्या जाती चे आहे ... म्हणजे दरेक पात्राचं संपूर्ण चित्र खूप विचार करून लिहिलेला आहे - इथे थोडी फार चुकाही खूप खूप महाग ठरली असती. There was
a real risk of getting the character development overdone. पण अशिकाही चूक नसल्या मुळे चित्रपट खपू सहज आणि खरं वाटतं. पात्रांचा स्वरूप खूप निर्मळ व सुरेख मांडल्या मुळे सगळी पात्रं आपुली वाटतात ... अगदी आमच्या तुमच्या सारखी!
तिसरी महत्वाची गोष्टं म्हणजे दिग्दर्शन ... ह्या सगळ्यांना एका गोष्टी मध्ये लोकां समोर आणणे काही सोपी गोष्ट नाहीच! ह्यासाठी दिग्दर्शकाच्या कामाला मानावं लागेल! आम्ही दोघी हे चित्रपट विसरणं सोपं नाही ठरणार ... खूप दिवसां नंतर असा एक चित्र सामोरी आला डोळ्यां समोर, मना समोर आणि अंतर्मना समोर येऊन जे तिनी जागी {मन, डोळे व अंतर्मन } स्पर्श करतं ... एवढेच नाही- आपल्याला नात्यांची ... लोकांची आणि जीवनाच्या बाबद पण एक खूप मोठं शिक्षण देऊन जाणारी गोष्टं असल्यामुळे हे चित्रपट आणि ह्यांचातले पात्रं तुम्हाला विसरणे शक्य नाही ठरणार ... कमीतकमी एवढ्या लवकर तर नाहीच! ह्यावर्षीच्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये तर आहेच - पण ह्या दशकाच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीं मध्ये हि आहेच, कमीत कमी मला तर हाच भास होतो!
Comments
Post a Comment