आज दिवाळी चा
पर्व ... अंधःकार वरती उजेडाचा
विजय पर्व, victory ऑफ गुड
over evil. प्रश्न
माझ्या मनात हा
आला कि अपण
हा पर्व कसा
बरं साजरा करायचा?
नुसतं घरा बाहेर
दिवे लावले, गोड खायचं, लक्ष्मी
पूजना नंतर {अर्थातच};
लोकांना भाटायचं - येवडंच?
काय दिवाळी चा
अर्थ फक्त हाच?
अपण कां म्हणून
हा पर्व - आपला सर्वात मोठा
पर्व - साजरा करतो?
कां म्हणून अपण
एवढी वाट बघत
बसतो दिवाळी च्या
दिवसा ची? सुट्टी मिळते,
गोङ वस्तू मिळतात, बाजार मस्त नटून थटून
सजून धजून बसतो
म्हणून? नातेवाईकांशी भेटीचा
दिवस म्हणून? एवढंच?
अंधःकार वरती उजेडाच्या
बद्दल काय म्हणायचं?
दिवाळी चा खरा
अर्थ काय होतो?
या मग नुसतं
लक्ष्मी पूजन? घराची
स्वच्छता? मनाची स्वच्छता
कां नको? जर
मनच स्वच्छ नसेल
- तर घराची स्वच्छता
चा अर्थ असतो
का?
अंधःकार वरती उजेडाचा
विजय पर्व, victory ऑफ गुड
over evil - ह्याचं
अपण कधी विचार
सुद्धा करतो का?
आणि त्याच्या बरोबर
ह्या सुंदर अतिसुंदर
परवाच्या मागचे कारणांचे
विवेचन आपल्या मनात
करायचा प्रयत्न कधी
केला? मी तर
कधीच नाही. बरोबर
आहे - तुम्ही लक्ष्मी
ची उपासना करा,
सुट्टी घ्या, मित्रां
व भावंडान बरोबर
आणि बायको पोरांबरोबर
सुट्टी चा सम्पूर्ण
आनंद घ्या. त्यात
चूक काहीच नाह.
सुट्टी हि एक
गरज आहे. आणि
शास्त्र पण पूजा
ला गरजेचं मानतात.
पण कमीत कमी
१० मिनिट एका
शांत जागी बसून
आपल्या मनातला अंधःकाराबद्दल विचार
करावा, माझं म्हणणं
एवढंच. आणि आज,
माझ्या शेचाळीस वर्षात
पहिल्यांदा हे मी
केलं ... महालक्ष्मी मंदिरात
पासून - मागितलं काहीच
नाही. फक्त बसून
अंतःकरणाला विचारलं - आत्मधला
अंधःकार कसा दूर
करायचा? काय चुका
आहे, कुठे चुका
होतात आहे. आणि
आजची दिवाळी माझी
खऱ्या अर्थात पहिली
दिवाळी. आज खरं
खरं कळलं दिवाळी
काय आहे!
चुका काढायच्या म्हणजे
भौतिक वस्तूं बाबत
नाही - चुका लोभ,
मोह च्या बन्धना
च्या, ज्या मुळे
अपण चांगुलपणा विसरून
करत बसतो. स्वतःचा
खरा खुरा चित्र
मांडायचा, स्वतःच्या अंतःकरण
पर्यंत पोचायचं. जेम्व्हा
मनातल्या दैत्यांचे समज
घेऊन बाहेर काढायचा
प्रयत्न होईल, तो
असेल खरा अंधःकार
वरती विजय! दोन्ही गर्जेचं
- बाहेर ची शुद्धता
हवीच; शास्त्र आणि
पूजा पण हवीच
- पण अंतःकरणाची स्वच्छता
पण तेवढीच गरजेची
आहे. सुटका नाही
त्या विणा. मनात
अंधःकार घेऊन पूजा
अर्चना बाहेर ची
स्वच्छता चा पूर्ण
लाभ मिळेल ह्यात
मला शन्का आहे.
कमीत कमी, माझा
हा विचार आहे!
म्हणून मलातर असेच
वाटतं आहे कि
आजची दिवाळी माझी
पहिली दिवाळी ह्या
जीवनाची.
हा फार छोटा
लेख आहे : माझं
म्हणणं फक्त एवढंच
कि थोडा मनाचा
पण विचार करावा;
थोडा हा हि
विचार करावा कि
आपण आपल्या मनातले
दैत्य, मनातला अंधःकार
काढू शकतो का?
आजच्या दिवशी १०
मिनिट द्या स्वतःला
- मनाला, अंतःकरणाला. विचार
करा. शांत जागेवरती
बसा - वाटल्यास महालक्ष्मी
च्या मंदिरात, किंव्हा
आपले जे पण
आराध्य असतील, त्यांच्या
मंदिरात किंव्हा पायाजवळ
बस. शांतपणे विचार
करावे - मी आपली
चुका कशी काढू,मनातल्या अंधःकाराला कसं
दूर करू? माझी
काय होत आहे?
भौतिक विचार सोडा,
फक्त १० मिनिटं
द्या स्वतःला. विचार
हा नको कि
भौतिक वस्तू कां
नाही मिळत, मी
कसा अजून कमावू : हे मोह
आहे, अहंकार आहे,
इच्छा आहे. विचार
हा करा - मी
कुठं देवा हुन,
morals आणि
ethics हुन,
सत्य हुन दूर
चाललो आहे? मनात
ईर्ष्या आहे का?
अहंकार आहे का?
लोभ आहे का
संताप आहे का?
पश्चाताप आहे का?
जर आहे - तर
कश्या बद्दल? बस,
एवढंच.
दिवाळी ह्या पर्व
चा अर्थ खूपंच
मोठा आहे - मी
फक्त एक स्वरूप
मांडला आहे ह्या
दिवसा चा. मी
कोणी मोठा ज्ञानी
नाही; मी शास्त्रज्ञ
नाही. जे मी
वाचलं त्या मुळे
मनात हे वरचे
विचार आले. अंधःकार
वरती उजेडाचा विजय
जर आपण मानता,
तर मग माझ्या
मते हा विचार
आजच्या दिवशी करायलाच
पाहिजे कि आपण
कसं आपल्या मनातले
अंधःकार काढू. जर
आपण दिवाळी चा
दुसरा अर्थ मानून
घेता - मग हे
लागू होत नाही,
असे मला वाटते.
शेवटी दिवाळी इतका
मोठा अर्थ आहे,
कि खूप अर्थ
निघून येतात, हे
ख्यात आहेच. श्री
राम चा अयोध्या
प्रवेश पण दिवाळीच.
अजूनही अर्थ आहे.
पण जे मी
मांडलं थोडं फार
पटलं असेल तर
विचार नक्की करा...
Comments
Post a Comment