काय म्हणावं आणि कुणाला म्हणावं असं झालंय; स्वप्निल ला अभिनंदन देऊ कि निर्देशक ला - या मग
पुस्तकाच्या लेखकाला? नाही तर मग ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांना? आणि बाकी कलाकार, खास म्हणून नितीश? शब्द नाही उरले मनामध्ये विवरण करायला, काहीच कळेनासं झालंय हा रिव्ह्यू लिहिताना. पण एक मात्र
नक्की - स्वप्नील ची गोष्टी व स्क्रिप्ट ची निव्वड अगदी अप्रतिम! मोघेही त्यांनी
नावीन्य दाखवलंच आपल्याला- म्हणून खरंतर हे आपल्याला नवीन भासायला नकोत, पण तरी समांतर बघितल्या नंतर आता पुन्हा ह्याची जाणीव होत
आहे. म्हणून सर्वप्रथम स्वप्निल भावाला अभिनंदन - त्याची स्क्रिप्ट ची निव्वड
बद्दल. हा त्याचा आणि सुबोध भावे ह्यांचा एक चिन्ह झाला आहेत - नेहेमी नावीन्य
असतं त्यांच्या चित्रपट आणि सिरीयल मध्ये.
पुन्हा एकदा अभिनंदन! तुम्हा दोघांची चित्रपट / सिरीयल इतकी वेगवेगळी प्रकार ची
असतात - हे कधीच सोडू नये ही विनंती.
दोघांना! आम्ही दर्शक उत्सुकतेने म्हणूनच वाट
बघतो तुमच्या चित्रपटाची!
गोष्टं
समांतर हे एक मराठी मधील बहुचर्चित पुस्तक, त्याचं
धारावाहिक मांडले आहे सर्वांनी. {शब्दांकडे लक्ष्य
द्यावे - मी कुणा एकाला उंचवटा देत नाही
ह्याच्या करता} कुमार महाजन हा एक त्रस्त मनुष्य असतो - आपले
भविष्य विचारायला एका पंडित माणसाकडे जातो मित्रांसोबत. तिथे ते भविष्य सांगायला
नाही म्हणतात, आणि सांगत तुझ्या आधीही एक आला होता, सुदर्शन चक्रपाणी - त्याचा आणि तुझ्या भविष्य एकाच. ३३ वर्ष जुनी गोष्ट.
इथून सुरु होतं समांतर... आणि कुमार महाजन शोधायला निघतो की कोण आहे हा सुदर्शन
चक्रपाणी? त्याचा ३३ वर्षाचा भूतकाळ म्हणजेच माझा ३३ वर्षाचा
भविष्य!
धारावाहिक म्हणजे नक्की काय?
असो; अपण पुढे वाढू. MxPlayer OTT
वर आलेलं नवीन धारावाहिक, समांतर. एका धारावाहिक मध्ये थोड्या फार वेगळ्या गोष्टी, वेगळे प्रमाण असतात त्याला सफल होण्या करता; खूप धारावाहिक येतात, सुरुवात तर नीट करतात, पण दर्शकांना बांधण्यात उत्कर्ष, यश पावत नाही. त्यामुळे, २-एक एपिसोड बघितले की दर्शक सुटतात. ह्यामुळे धारावाहिक चं रिव्यू करताना चित्रपटाहून वेगळेपणाने पाहावं
लागतें. मी एक साधारण दर्शक; मी कां संपूर्ण बघीन? मला बांधून ठेवा, गोष्टी मध्ये गुंतून ठेवा. मला सोडायचा कारणच सामोरी आलेला
चालणार नाही - हे लक्ष्य असायला हवं. ह्याकरता, दर्शकांची आवड-निवड काय आहे त्याची जाणीव मात्र असायला हवी, निर्देशक, निर्माता, कलाकार तीघांना. हे तिन्ही जेम्व्हा एक रेषेत जुळतात, तेम्हा निर्माण होतो एक समांतर, एक एका लग्नाची दुसरी गोष्टं, एक रुद्रम, एक उंच माझा झोका ... आणि तयार होतात अविस्मरणीय आठवणी
दर्शकांच्या मनात, जे विसरणे शक्य नाही. हा सर्वात मोठा फरक आहे चित्रपट आणि धारावाहिक मध्ये; चित्रपट २ तासात संपतं
- धारावाहिक मात्र तासोन्तास दर्शकाशी संबंध ठेवत असतं. आणि यश साठी
दर्शकाचा मनाशी गूढ संबंध निर्माण करायला हवा - आणि हेच झालं समांतर मध्ये!
संपूर्ण टीम ला मनःपूर्वक अभिनंदन!
समांतर - आभिनय
प्रश्ण हा आहे कि असे काय घडले समांतर मध्ये कि इतकी आवड
निर्माण झाली मनात? एकच वस्तू नव्हे - सगळ्याच एक रेषेने जुळून आल्या. सुरुवात करू अभिनय - जे
सगळ्यांना स्पष्ट पणे दिसत असतं. अभिनय मध्ये दोंन नावं - स्वप्निल आणि नितीश.
स्वप्निल नी तर कमालच केली, अगदी अक्षरशः दंग करणारा, स्तब्ध करणारा अभिनय. कलाकार नाही, असं वाटलं की खरंच कुमार महाजन पडद्यावर उतरला आहे. आणखी
काय उपाधी देऊ? एवढंच
पुरे. दुसरी गोष्टं अशी, ह्या अभिनय मध्ये स्वप्निल नी पुन्हा नावीन्य दाखवलं; आधी एखाद वेळी पण असा प्रसंग आपण पहिला जेम्व्हा रागिट दर्शन कलाकार होता त्यांचा. पण ह्याच्यात अगदी वेगळं! तसंच हवं, हीच असते खरी कलाकारी.
आणि नितीश? म्हणायची गरज नाही, तरी सांगतो. स्वप्निलच्या सामोरी उभा नितीश, पण कोण्ही दुसऱ्या वर भारी पडला नाही. बाकी कलाकार होतेच -
त्यात तेजस्विनी होत्या, पण स्क्रीन वेळ कमी असल्यामुळे तेवढं दिसून आल्या नाही. पुढच्या भागात तर
त्यांचा वर्चस्व जास्तीच होणार, निःसंकोच. गोष्टीवरून कळून आले. तरीपण त्यांनी आपला चिन्ह
स्पष्ट पणे टाकला माझ्या मनात, फार आत्मीयते ने केलेला उत्कृष्ट अभिनय! अभिनय ला साहाय्य करणारी इतर वस्तू असतात - वेशभूषा, सेटिंग, आणि बरच काही. त्यांच्या साहाय्याविना उत्कृष्टता संभवत
नाही - आणि निर्देशन? एका ओळीत सांगतो - बाकी लोकांची तारीफ काली आहे, तर समजावं निर्देशक पण चांगला, आणि त्याचं हे परफॉर्मन्स पण मस्तच!
समांतर - स्क्रिप्ट, लेखन
अभिनय नंतर येते स्क्रिप्ट; खरंतर दोन्ही बरोबर चालतात. एक दुसऱ्या ला सहारा देत पुढे
वाढतात;
आणि धारावाहिक मध्ये ही गोष्टं अतिशय महत्वाची असते. चित्रपट
तर तासात संपणार - एकामध्ये चुकामुक झाली तर दुसरा सांभाळतो. धारावाहिक मध्ये ते
शक्य नव्हे; म्हणून
महत्व वाढतो. आणि मग बांधणे ही गरजेचं; दर्शक २० मिनिटातच सुटू शकतो! दरेक भाग अश्या जागी संपतो, की तुम्ही ओढले जात
असता,
सतत. सलग बघावंच
लागतं! दुसरीगोष्टं अशी की दरेक
छोटे मोठे सीन सुंदरता ने एकमेघात पेरलेले; तर सुटत नाही, आणि गोष्टं सरळ पण
अतिशय वेगाने पुढे वाढत जाते... आणि जशी जशी ही वाढते, तशी तशी तुम्ही मोती आणि धाग्या सारखे पेरले जाता त्यात!
इतर बिंदू
तुम्ही हे बघितलं असेल आत्ता पर्यंत, की मी सस्पेन्स, थ्रिलर सारख्या कोणच्याही वस्तू कडे लक्ष्य दिलं नाही; धारावाहिक मध्ये ह्या दुसऱ्या दर्जा वर येतात. धारावाहिक ते, जे गुंतवतं तुम्हाला, ओढतं, पेरत असतं स्वतःच्या
सागरात दर्शकाला! आणि अभिनय - ह्या दोन
मुख्य प्रमाण! बाकी सर्व काही दुसऱ्या दर्जा वर येते. मग ते काही कां नसो - प्रेम
असो व थ्रिलर, हरकत
नाही. असो, पण आता
हे कबूल आहेच की सुस्पेन्स जसा मांडला आहे {शब्दांकडे लक्ष्य द्यावे, सस्पेंस तयार करावा लागतो} ते अप्रतिम. सस्पेन्स थ्रिल उत्पन्न होतात स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि base गोष्टींमधून, त्यांचा आपसी तालमेल हून. ह्या जुळल्या की तयार तुमचा एक
उत्कृष्ट सस्पेन्स - समांतर मध्ये ह्याच्यात उंच दर्जाचा साफल्य मिळालेला आहे टीम
ला.
निष्कर्ष
रिव्यू चा निष्कर्ष हाच - एक अति उत्कृष्ट धारावाहिक, माणसाला ओढणारं आणि
आपल्यात गुंतवणारं; अभिनय निर्माण निर्देशन कथा लेखन स्क्रिप्ट स्क्रीनप्ले आणि संगीत मध्ये मस्त
तालमेल,
ज्याला इंग्रजीत बॅलन्स म्हणता येईल, असा हा धारावाहिक. अविस्मरणीय. पण धारावाहिक मध्ये एक दोन
अजून गोष्टी असतात - एक तर, काय दर्शक व मुख्य कलाकार शी सामंजस्य, एकजीवपणा भासतात? नक्कीच; नऊव्या एपिसोड येत येत तुम्ही सगळ्या कलाकार बरोबर एक
मैत्री स्थापन करता. आणि हीच गोष्ट
दुसऱ्या महत्वा च्या बिंदू कडे नेते : मे तुम्ही पुन्हा बघाल? धारावाहिक मध्ये हे एक असं पाडाव असतं जे सर्वात मोठं; ह्याच्या सारखा दुसरा बिंदू नाही. उत्तर आहे, नक्कीच. खूप कमी अशे धारावाहिक आलेले आहेत - दोन-एक मी वरती
सांगितले;
अजूनही आहेतच, पण एवढे पुरे उदारहर्णार्थ. आणि त्या पुन्हा-पुन्हा
बघणाऱ्या धारावीहीकां मध्ये तुम्ही आता एक अजून नाव जोडू शकाल - समांतर!
Comments
Post a Comment