हीच आमुची प्रार्थना
अन हेच आमुचे मागणे, माणसांनी माणसाशी माणसा सम वागणे! धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे; एक निष्ठा,
एक आशा,एक रंगी रंगू दे...
आज हे गाणं खूप लक्ष्यात येत आहे...
कारण त्याचं मागील दोन तीन दिवसान
पासून धर्मावरती वार्तालाप झाला माझा वेग-वेगळ्या लोकांशी
: तेम्हा माझ्या मनात एकच आलं कि आपण सगळे - त्यात मला पण घ्या - आपण सगळेच धर्माच्या
शिक्षणापेक्षा जास्त महत्व त्याच्या नावा ला देतो; त्यात तेवढं काही मोठं चुकीचं
काहीच नाही, पण मला एक विचार आला आपण सगळेच जेवढं लक्ष्य नावाकडे
देतो तेवढं लक्ष्य
धर्माच्या अनुसरण वरती देतो का? नाही; आज्जीबातच नाही. आणि हेच मला आता कळायला लागलं आहे - नुसतं नावाचं पूजन करून फायदा काय? काहीच नाही! ते तर वर-वरचं आड्म्बर झालं!
माणूस आजकाल इथेच फसतो; कारण आपणच हे धर्म बनवले; मी आजकाल जे चाललं आहे त्याबाबत
म्हणतो आहे. देवांनी
सांगितलेले धर्म तर आपल्या वेदांत साहित्यात
सविस्तर सांगितलेले आहे; आजकाल जे चाललं आहे आणि जी वैदिक पद्धती त्यात किती फरक झालेला आहे! पण हे समजणार
कोण - लोकांना तर वेळच नाही किंव्हा आवडच नाही वेद उपनिषद
साहित्य वाचायची! आणि कुणी सांगत असेल तर ऐकायला किंव्हा
समजायला तयार नाही; कारण काही असू द्या. जर माझ्या
धर्माच्या लोकांमध्ये असं असेल, तर इतर धर्मातही
असच असणार - ह्या मुळे शास्त्रांबाबत समजुती च्या चुका
उत्पन्न
होणारच होणार! मग तो धर्म कोणचा हि कां नसो. आधी च्या काळी सनगोष्टी ह्याच्या, नाटक हवायचे
ज्यांच्या मुळे शास्त्रांचे
ज्ञान लोकांमध्ये पसरल्याचे; पण आता ते सुद्धा थांबलं!
माझ्या मनात हिंदू धर्म च्या सध्या प्रचलित धारणा ज्याला
बाबत प्रष्ण म्हणूनच
उदभवले - आपण जे मनात ठाम घेऊन बसतो - हो, मी हिंदूच;
मी ख्रिस्ती; वगैरे वगैरे; किंव्हा इतरही अहंकार
व अज्ञान जनित आपले विचार व धारणा - त्यांचा उल्लेख किंहा आधार कोणच्या ही उपनिषद, गीता व रामायण मध्ये मिळालेला
नाही! मी १० - ११ उपनिषद २-३दा
वाचली; गीता जणू कितीदा
वाचली - पण कुठेही सन्दर्भ
जुळेचना! सगळ्यांचा मचकूर एकच मी घेतला - धर्म हे देवांनी दिलेला
मार्ग आहे, त्यांच्या
जवळ पोचायचा; त्यांनी
हे स्पष्ट केलेलं
आहे की प्रेम माझ्याशी करा. ह्याचा
हा अर्थ कोठून निघतो कि आपण प्रेम त्या मार्गवर
ठेवायचा? मार्ग तर मार्ग असतो - गन्तव्य
पोचायचा एक मार्ग. जसा तुम्ही निवडलेला
मार्ग तुम्हाला आवडतो, दुसऱ्या
लोकांना
दुसरा मार्ग
आवडतो. बस, एवढच
देवांनी सांगितलेला एक मार्ग तुम्हाला आवडतो हे कबूल - पण प्रेम मात्र त्या मार्ग वरती ठेवून काय उपयोग? तुमचा उद्देश्य काय आहे - देवा जवळ पोचण्याचा,
हो कि नाही? मग जेम्व्हा मार्ग सम्पेल
तुम्ही कुठे जाणार, काय करणार? ह्याचा
पण विचार करावा! मार्गावर प्रेम केल्यानंतर
गन्तव्य कधीच भेटणार
नाही - कारण तुम्ही तर त्या तुमच्या निवडलेल्या रस्त्यावर चालत चालत मग्न आहात; तुमची वाट सम्पणार नाही - पण वाटे ची एक गोष्ट खास असते - ती कधी न कधी सम्पायला हवी. तुम्ही
आपल्या धुंदीत मग्न राहाल, आणि आपण हा मार्ग एका निश्चित जागी पोचायला
घेतला हे मात्र विसरणार! होणार काय? कधी न सम्पणारा
मार्ग!
जर मार्ग घेऊन एका निश्चित
जागी पोचायचं असेल - तर मग त्या जागे चा पत्ता नीट लक्ष्यात हवा; त्याची
दिशा, तेथे पोचायला
कोणचे वळण घ्यायचे
आणि कोणचे वळणं सोडायचे ह्याचा ज्ञान हवा. त्याशिवाय के मनात लक्ष्य असावं की मी कुठे चाललो आहे; आणि पाउलांमध्ये
वळण हवं, पाऊल वरती नियंत्रण हवं - कुठे पाय ठेवायचे आणि कुठे नाही. हे केल्या शिवाय कुनीपण
कुठेही पोचू शकतच नाही. अगदी अशक्य. आता तुम्ही काय पर्याय घ्यायचा हा निर्णय तुम्ही स्वतःच करा - तुम्हाला
चालत राहायचं आहे, कि आपल्या शेवट च्या गन्तव्य वर पोचून आनंददायी आराम घायचा आहे? आणि ह्या निर्णय साठी गरज आहे तर फक्त आपल्या खऱ्या लक्ष्याची
जाणीव, कोणचे पाय कशे उचलायचे ह्याचा
वर नियंत्रण.
आता मात्र एक गोष्ट उरली - एकच अहंकार संताप लालसा अभिमान मनात ठेवून काय तुम्ही देवा जवळ जाऊ शकता? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच
द्यायचं आहे आपल्या
मनात. आणि त्याहून
जुळलेला दुसरा प्रश्न
- काय मी आपल्या आवडीच्या मार्ग वर अभिमान ठेवणे बरोबर आहे? प्रेम आवड देवाची ठेवा; मार्गाच्या
नावामध्ये काय ठेवलं आहे? आजकाल ह्या गोष्टी ची खूप खूप गरज आहे - हे कळायला हवं माणसांना कि सर्व मनुष्य, हि सर्व प्रकृती, त्या एकाच देवाची आहे - मग नाव काही कां असो. म्हणूनच ते प्रसिद्ध गाणं म्हणालो
- धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे; एक निष्ठा, एक आशा,एक रंगी रंगू दे...! ह्या लेखाच्या शेवटी ह्याच गाण्याची ओळ सांगतो - भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री! तोवरी देई आम्हाला काजव्यांचे
जागणे माणसाने माणसाशी
माणसासम वागणे! अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे ... या चला, आपण मार्ग चा प्रेम सोडून गन्तव्य म्हणजे परब्रह्म
कडे लक्ष्य करूया
... नाव काही म्हणा त्यांना - आपल्या धर्मानुसार!
Directional insights & thoughts. A clear picture of statistics needed to reach our goal. Thanks for sharing 🙏😊
ReplyDeleteThanks a lot Manjuji; glad you could relate; and thanks for the appreciation - it gives me confidence to keep writing!
Delete