माझ्या मना
आता पुन्हा ... शोधू
नको भरती जुनी
लाट्या जुन्या ... जोडू नको तुटला
दुवा ... मागू नको
मिटल्या खुणा... एकटा
मी एकटे मन
एकटी स्पन्दने!
साधारण पणे
वरती लिहिली ओळ
किंव्हा गाणं कुणी
खरंच म्हणायला लागेल
तर अपण त्याला
डिप्रेशन मध्ये असलेलं
समजू; पण, आज
घरी येताना माझ्या
मनात खरंच हीच
ओळ होती. माझ्या
मना आता पुन्हा
... शोधू नको भरती
जुनी लाट्या जुन्या
... जोडू नको तुटला
दुवा ... मागू नको
मिटल्या खुणा... एकटा
मी एकटे मन
एकटी स्पन्दने! ह्याचा
अर्थ हे मुळीच
काढू नये कि
मी डिप्रेशन मध्ये गेलेलो आहे...
उलट, मी जगाच्या
कोलाहलातनं निघून घराच्या
शांतता मध्ये पाऊल
ठेऊन फारच रिलॅक्स
झालो - आरामात शांतता
आणि एकटेपणाचा संपूर्ण
आनंद लुटू शकलो.
मनात अशी शांतता
पसरली; असं वाटलं
कि नका आता
कोलाहल, नको आता
हल्लागुल्ला, नको आता
आवाज. जर कुठे
मनाला अराम असेल
- तर अश्याच शांत
वातावरणात असेल. हि
शांतता मनाचा थकवा
हरवून गेली; दिवस
भरच्या जगाच्या कोलाहलतुन निघून अशी शांतता भेटली कि मन अगदी तृप्त झालं!. हा
काय मनाचा भ्रम
आहे? काय हे
एक क्षणिक अनुभव
आहे, ज्याचा काहीच
आधार नाही? असं
तर नाही कि
स्वतःला अहंकारामुळे खपू
जास्त क्रेडिट देतो
आहे, किंव्हा स्वतःला
खूप जास्त समजत
आहे? हि माझी
गैरसमज तर नाही?
हे प्रश्न - आणि
अजून जणू कितीक
प्रश्न - मला सोडवायची
आहेच खरंतर. पण
एक सांगू - ह्या
प्रहसनांचा ना त्रास
आहे, ना ओढ,
ना विचार, ना
भीती. जरी अहंकार
असला - तरी त्यावर
विजय करायला मला
आवडेल. कारण अंतर्मनातून
आवड निवड, द्वेष-क्लेश संपले
आहे. आता मनात
काहीच प्रश्न नाही;
वरती लिहिलेले प्रश्न
सुद्धा नाही. ते
जशे लिहिले, ताबडतोप
मनातून बाहेर गेले
सगळे. स्थिर, स्थावर
जंगम स्थित आहे-
सध्यातरी. आणि जर
हेच मी ठेवू
शकलो - तर अहंकारावर्ती विजय
पण शक्य आहे.
आणि हा प्रश्न
वेळच सुटवेल...
आधीपण मी
दोन लेख लिहिले
आहे - शांतता आणि
एकटेपण. हे आजचं
नाही माझ्या साठी
- पण ह्याच्या आधी
असा तीव्र अहसास
झाला नव्हता. शांत
वातावरण आणि जग
वेगळं राहणं मला
कधीच त्रासाचं वाटलं
नाही. मी माणूस
घाणी नाही - मला
माणसात राहणं हे
पण आवडतंच. पण
जेम्व्हा कधी एकटा
राहायलो त्रास नाही
झाला - अशे प्रसन्ग
माझ्या जीवनी खूप,
खूपच आले जन्मा
पासून. अजूनही माघील
कितीक वर्ष एकटाच राहतो आहे
नौकरी च्या प्रपंचामुळे.
पण त्रास कधीच
नाही झाला; त्रास
तर सोडा - कधी
मनात हे आलं
पण नाही कि
मी एकटा आहे.
जन्माला आलो तेम्हा
पासून एकटेपणाच बघितला - छोटा होतो
तेम्हा पासून . सगळं
मला साधारण वाटायचं.
माणसं आहे - झकास.
माणसं नाही – झकास.
अपण आपला आपल्या
जगात मस्त.
लोकांची ची
हि फार वाईट
सवय असते - टीका
टिप्पणी करण्याची. असं
कोणी जग वेगळं
भेटलं - ते बघवलं
जात नाही लोकांपासून.
ह्याला लोकं जणू
कां प्रॉब्लेम म्हणून
मांडतात .. दर माणसाचा
स्वभाव वेगळा असतो.
तो जसा आहे
- तसा स्वीकार करा
त्याला. हे पण
कुणालाच जमत नाही.
आणि मला हे
सहजपणे जमतं. असो;
मी काही जग
सुधारायला नाही निघालो
आहे! मुद्दा हा
आहे कि कि
एकटेपणा स्वतःहून एक
प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम
उभार घेतो इतर
सवई पासून.
निष्कर्ष कहडायला आपल्याला
हे बघायचं असतं
कि अश्या वागणूक
चा कारण काय
आहे.
असो. विसरण्याच्या अधी
मी मुख्य मुद्दा
समोर मांडतो. आज
घरात फक्त पंख्याची
आवाज आहे - आणि
माझ्यामनातली आवाज. आज
मी माझ्या स्वतःच्या
खूप जवळ आलो
आहे असं वाटत
आहे. काहीच आवाज
नाही - शून्य. कोणाचं
बोलणं नाही, कोणाची
आवाज असो वा
स्पर्श - काहीच जवळपास
नाही. मनात इतकी
शांतता - जी मी
कित्तेक वर्षाहून शोधत
होतो, आज भेटली.
आता असं वाटतं
आहे जे काही
आयुष्यात घडलं - त्याच्या
माघे कारण असावा.
ते घडलं नसतं
तर आजचा अनुभव
भागी आला नसता.
आज मी इच्छा
शून्य झालो , सध्या
साठी तरी. जगाची
मृगतृष्णा पुन्हा मला
जकडेल ह्यात काहीच
वाद नाही - पण
आज गीता चा
आणि उपनिषदांचा सार
ठवडाफार कळायला लागला
आहे. आज मला
कबूल - ह्या जगात
राहून सुद्धा माणूस
आपल्या सगळ्या इंद्रियांवरती विजय पावू
शकतो; आपल्या इच्छा
द्वेष अहंकार आणि
रागावरती विजय करू
शकतो.
वाट सोपी
आज्जीबातच नाही - हे लक्ष्यात ठेवा.
हि वाट खूप
क्लिष्ट आणि त्रासदायी
वाट आहे. पण
एक मला लक्ष्यात
आलं - ह्या मार्गी
आलेल्या प्रत्येक क्षणात
मला एकदाही वेगळा
असण्याचा किंव्हा एकटा
असण्याचा त्रास नाही
झाला; कधी कधी
काळजी मात्र हवायची
- कसं होणार; ते
पण खपू कमी
वेळा. जास्त करून
त्रास हाच हवायचा
- मीच कां? हे
कधीच मनात आलं
नाही कि मी
बदलू का? फक्त
एकच प्रश्न असायचा
- माझाच बरोबर कां
बरं घडतं आहे
हे सगळं? दुसऱ्यांविषयी कधी
मनात ईर्ष्या उत्पन्न
नाही झाली - तो
त्याच्या मार्गी, मी
आपल्या मार्गी. दोनी
खुश! पण हा
प्रश्न सुटेचना कि
असं कां? त्रास
हा कधीच नव्हता
- जन्माहून - कि मला
हे भागी आलं
नाही किंव्हा ते
मिळालं. प्रश्न एकच
- जर मी चुकत
नाही, तर सगळे
प्रश्न मलाच कां
बरं भागिले आहे?
आता कुठे
तरी जाऊन असं
वाटत आहे कि
गुंतणे सुटायला आले
माझ्या मनातले. आता
थोडा इशारा भेटला
आहे. गीता मध्ये लिहिलं
आहे - शांत वातावरण
आवडायला लागतं त्या
माणसाला ज्याच्यात सात्विक
गुण उत्पन्न होतात.
मोक्षाच्या मार्गवरचा हा
एक पडावंच म्हणावा,
आपल्या उपनिषद आणि
गीता अनुसार. मला
नीटपणे कळल्यावर इथेच
मांडीन सविस्तर; सध्या
इतकंच पुरे. ह्याला
वाटल्यास माझ्या वाहिनी
च्या शब्दातनं सांगितलं
तर अलिप्त होणे
म्हणू शकता - जे
काही असेल. पण
आता जगात लोकांशी
वैर पण संपायला
आला; आणि ओढ
तर संपलीच म्हणा.. प्रेम आहे
- आपली माणसं शेवटी
आपलीच असतात. पण
ओढ नव्हे; सोडलं
ते. त्यांना पण
जगू द्या त्यांच्या
इच्छे प्रमाणे... त्यांना
त्यांची वाट स्वतःच
शोधावी लागेल. मी
त्यांची वाट चालू
शकत नाही.
हा काय
मनाचा भ्रम आहे?
काय हे एक
क्षणिक अनुभव आहे,
ज्याचा काहीच आधार
नाही? असं तर
नाही कि स्वतःला
अहंकारामुळे खपू जास्त
क्रेडिट देतो आहे,
किंव्हा स्वतःला खूप
जास्त समजत आहे?
हि माझी गैरसमज
तर नाही? हे
प्रश्न - आणि अजून
जणू कितीक प्रश्न
- मला सोडवायची आहेच
खरंतर. पण एक
सांगू - ह्या प्रहसनांचा ना त्रास
आहे, ना ओढ,
ना विचार, ना
भीती. जरी अहंकार.
असला - तरी त्यावर
विजय करायला मला
आवडेल. कारण अंतर्मनातून
आवड निवड, द्वेष-क्लेश संपले
आहे. आता मनात
काहीच प्रश्न नाही;
वरती लिहिलेले प्रश्न
सुद्धा नाही. ते
जशे लिहिले, ताबडतोप
मनातून बाहेर गेले
सगळे. स्थिर, स्थावर
जंगम स्थित आहे-
सध्यातरी. आणि जर
हेच मी ठेवू
शकलो - तर अहंकारावर्ती विजय
पण शक्य आहे.
आणि हा प्रश्न
वेळच सुटवेल ...
Comments
Post a Comment